CoronaVirus Updates: दुसऱ्या दिवशी मृत्यू १,७०० पेक्षा कमी; नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 06:07 AM2021-06-20T06:07:15+5:302021-06-20T06:07:31+5:30

केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चोवीस तासांत ६० हजार ७५३ नवे रुग्ण सापडले, तर ९७ हजार ७४३ जण बरे झाले.

CoronaVirus Updates: Less than 1,700 deaths the next day in india; More patients recover than new patients | CoronaVirus Updates: दुसऱ्या दिवशी मृत्यू १,७०० पेक्षा कमी; नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक

CoronaVirus Updates: दुसऱ्या दिवशी मृत्यू १,७०० पेक्षा कमी; नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक

googlenewsNext

नवी दिल्ली : देशात कोरोनामुळे मरण पावलेल्यांचा आकडा सलग दुसऱ्या दिवशीही १,७०० पेक्षा कमी होता. गेल्या चोवीस तासांमध्ये ६० हजार नवे रुग्ण आढळले, तर ९७ हजार जण बरे झाले. उपचार घेणाऱ्यांचे गेल्या ७४ दिवसांतील सर्वात कमी प्रमाण नोंदले गेले आहे. एकूण रुग्णांपैकी ९६.१६ टक्के लोक आता बरे झाले. 

केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चोवीस तासांत ६० हजार ७५३ नवे रुग्ण सापडले, तर ९७ हजार ७४३ जण बरे झाले. सलग ३७ व्या दिवशी नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. नव्या रुग्णांपैकी ६९ टक्के जण महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक या पाच राज्यांतील आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीचे २७ कोटी २३ लाख ८८ हजार ७८३ डोस देण्यात आले आहेत. डॉक्टरांवर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन साथीच्या रोगाच्या दुरुस्ती केलेल्या कायद्यानुसार कारवाई करा, असे निर्देश केंद्र सरकारने राज्यांना दिले आहेत.

 

Web Title: CoronaVirus Updates: Less than 1,700 deaths the next day in india; More patients recover than new patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.