शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus १ लाख ३४ हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2020 05:08 IST

३१ हजार डॉक्टरांचा पुढाकार । ३० टक्के रुग्ण तबलिगींशी संबधित

नवी दिल्ली : कोरोनाच्या लढ्यासाठी भारत क्षणोक्षणी सुसज्ज होत आहे. गेल्या १५ दिवसांत आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शिकेनुसार विविध राज्यांनी १ लाख ३४ हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे तर ३१ हजार निवृत्त, खासगी डॉक्टरांनी स्वयंस्फूर्तीने मदतीची तयारी दाखवली असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी दिली.

एअर इंडिया व खासगी ९७ विमानांच्या मदतीने ईशान्येकडील राज्यांसह संपूर्ण देशभर १९० टन साहित्य पोहोचवण्यात आले. त्यात वैद्यकीय उपकरणे, मास्क, औषधी तसेच व्हेंटीलेटरचा समावेश आहे. रुग्णसंख्या वाढल्यास काय करावे, आरोग्य व्यवस्थापन कसे असेल, यावर प्रशिक्षणात भर देण्यात आला होता, असेही अगरवालम्हणाले.एखाद्या संसर्गजन्य आजाराशी दररोज संघर्ष करावा लागतो. त्यामुळे निझामुद्दीन मरकजमध्ये भाग घेतलेल्या व त्यांच्या संपर्कातील सर्वांपर्यंत पोहोचलो, असे आज म्हणता येणार नाही. १७ राज्यांमध्ये युद्धपातळीवर सर्वांचा शोध घेतला जात आहे. १०२३ रूग्ण निझामुद्दीन तबलिगी मरकजमध्ये भाग घेतलेले किंवा त्यांच्या संपर्कात आलेले आहेत. एकूण रूग्णसंख्येच्या तुलनेत हा आकडा ३० टक्के आहे. सर्व विकसित देशांप्रमाणे भारतानेदेखील चाचणीची क्षमता हळूहळू वाढवली. एकूण ७५ हजार नमुने आतापर्यंत तापसण्यात आले आहेत. १०० पेक्षा जास्त सरकारी व खासगी प्रयोगशाळांमध्ये चाचणी होत आहे, अशी माहितीही लव अगरवाल यांनी दिली.

१७ राज्ये २२ हजार क्वारंटाईनकेंद्रीय गृह मंत्रालयाच्या संयुक्त सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव पत्रकार परिषदेत म्हणाल्या, निजामुद्दीन तबलिगी मरकजमध्ये सहभागी झालेले व त्यांच्या संपर्कातील २२ हजार लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. परंतु अद्यापही काही जणांपर्यंत सरकारी यंत्रणा पोहोचू न शकल्याची शक्यता आहे.गृह मंत्रालयाच्या हेल्पलाईनवर अहोरात्र २०० जण काम करीत आहेत. प्रत्येक राज्याशी संपर्क साधला जातो. त्यामुळे गावागावांत सज्जता वाढते आहे. एसडीआरएफ निधीसाठी केंद्राने ११९२ कोटी रुपये दिले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या