शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
2
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
3
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
5
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
7
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
8
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
9
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
10
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
11
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
12
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
13
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
14
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
15
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
16
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
17
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
18
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
19
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
20
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी

Coronavirus: ...तर पुढच्या दोन आठवड्यात संपुष्टात येईल कोरोनाची दुसरी लाट, तज्ज्ञांचं सकारात्मक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 6:57 PM

Coronavirus in India: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शिखर गाठल्यानंतर आता ही लाट कधीपर्यंत सुरू राहील, असा प्रश्न आता विचारला जात आहे

नवी दिल्ली - भारतात आलेली कोरोना विषाणूची दुसरी लाट आता जवळपास ओसरू लागली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस भारतात सुरू झालेल्या कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत एप्रिलच्या अखेरीस चार लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होऊ लागली होती. मात्र ९ मेनंतर कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने घट होऊ लागली असून, देश कोरोनाविरोधात योग्य पद्धतीने लढत असल्याचे ते संकेत आहेत. दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शिखर गाठल्यानंतर आता ही लाट कधीपर्यंत सुरू राहील, असा प्रश्न आता विचारला जात आहे,  या प्रश्नाचे उत्तर आता सफदरजंग रुग्णालयातील कम्युनिटी मेडिसिन विभागाचे प्राध्यापक आणि मुख्य डॉक्टर जुगल किशोर यांनी दिले आहे. (the second wave of coronavirus will end in the next two weeks in India)

जर सारे काही व्यवस्थित घडले तर कोरोनाची दुसरी लाट कमाल दहा दिवसांपासून ते दोन आडवड्यांदरम्यान संपुष्टात येईल, अशी शक्यता डॉ. जुगल किशोर यांनी वर्तवली. 

मात्र जुगल किशोर यांनी सांगितले की, भारतामधून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे ओसरणे हे अनेक बाबींवर अवलंबून आहे. यामध्ये सर्वात प्रमुख आहे ते म्हणजे आपण सर्वांनी कोविडबाबतच्या नियमांचे कठोरपणे पालन करावे आणि या विषाणूला रोखण्यासाठी आपली भूमिका पार पाडावी. मात्र जर रस्त्यांवर  लोकांची गर्दी कायम राहिली. बाजारात वर्दळ राहिली तर कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याचा कालावधी तेवढाच अधिक प्रमाणात वाढेल. याशिवाय लसीकरणाचा वेग वाढवला आणि अधिकाधिक लोकांचे लसीकरण केले तर आपण या लाटेला वेळेवर थोपवण्यात यशस्वी ठरू. लस मिळाल्याने या विषाणूला पसरण्यापासून रोखता येऊ शकेल.

डॉ. जुगल किशोर यांच्या म्हणण्यानुसार कोरोनाच्या. सक्रिय रुग्णांच्या संख्येत जसजशी घट होईल. तसतसा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोपही कमी होईल. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर दोन किंवा तीन दिवसांनी यासंबंधीची लक्षणे दिसू लागतात. अशा परिस्थितीत पुढचे दहा दिवस खूप महत्त्वपूर्ण ठरतात. केवळ रुग्णांसाठीच नव्हेतर रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांसाठीही यादरम्यान काही त्रास न जाणवल्यास ती चांगली बाब आहे. मात्र त्रास जाणवल्यास त्याला त्वरित आयसोलेट केले पाहिजे. 

सक्रिय रुग्णांचे प्रमाण कमी होणे हे रुग्णांचे कॉन्टॅक्ट कमी होत असल्याचा पुरावा आहेत. ही बाब कठोर नियमांमुळे शक्य झाली आहे. देशातील बहुतांश लोक कोरोनाबाधित झाले आहेत. यामधील काही जण हे औषधांच्या माध्यमातून तर काहीजण प्रबळ प्रतिकार शक्ती मुळे कोरोनामधून बरे झाले आहेत. तसेच या लोकांच्या संपर्कात असलेल्यांपैकी मोजक्याच लोकांना रुग्णालयात जाण्याची गरज भासली असेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याIndiaभारतHealthआरोग्य