शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

Coronavirus : ३६ देशांतील प्रवाशांना भारतात येण्यास तात्पुरती प्रवेशबंदी, ११ देशांतून येणाऱ्यांना एकांतवास बंधनकारक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 06:10 IST

प्रवेशबंदी केलेले देश वगळता ओव्हरसीज सिटिझन आॅफ इंडिया (ओसीआय) कार्डधारकांनी भारतात येण्यासाठी व्हिसाकरता नव्याने संबंधित भारतीय दूतावासाकडे अर्ज करावा असे त्यांना सांगण्यात आले आहे.

नवी दिल्ली : कोरोना साथीच्या फैलावामुळे ३६ देशांतील नागरिकांना भारताने तात्पुरती प्रवेशबंदी केली आहे. तर ११ देशांमधून भारतात येणा-या प्रवाशांना १४ दिवस क्वारंटाईनमध्ये राहाणे बंधनकारक आहे.यासंदर्भात केंद्रीय आरोग्य खात्याने सांगितले की, प्रवेशबंदी केलेले देश वगळता ओव्हरसीज सिटिझन आॅफ इंडिया (ओसीआय) कार्डधारकांनी भारतात येण्यासाठी व्हिसाकरता नव्याने संबंधित भारतीय दूतावासाकडे अर्ज करावा असे त्यांना सांगण्यात आले आहे. ज्या ३६ देशांतील प्रवाशांना प्रवेशबंदी केली आहे त्यामध्ये आॅस्ट्रेलिया, बेल्जियम, क्रोएशिया, सायप्रस, झेक रिपिब्लक, डेन्मार्क, इस्टोनिया, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, आईसलंड, हंगेरी, आयर्लंड, इटली, लॅटव्हिया, लिटेनस्टिन, लिथुआनिया, लक्झेमबर्ग, माल्टा, नेदरलँड्स, नॉर्वे, पोलंड, पोर्तुगाल, रोमानिया, स्लोवाकिया, स्लोवेनिया, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड, तुर्कस्थान, ब्रिटन आदी देशांचा समावेश आहे. या देशांतील प्रवाशांसाठी लागू केलेली प्रवेशबंदी १२ मार्चपासून तर फिलिपिन्स, मलेशिया, अफगाणिस्तानच्या प्रवाशांसाठीची प्रवेशबंदी १७ मार्चपासून अंमलात आली आहे. तसेच संयुक्त अरब अमिरात, कतार, ओमान, कुवैत, चीन, दक्षिण कोरिया, इराण, इटली, स्पेन, फ्रान्स येथून परतणाऱ्यांना क्वारंटाइनमध्ये राहावे लागणार आहे. दक्षिण कोरिया, इटली येथून परतणाºया प्रवाशांनी कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचे प्रमाणपत्र स्वत:सोबत आणणे बंधनकारक आहे.26000जण आखाती देशांतून परतणारकोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आखाती देशांतून भारतामध्ये येत्या दोन आठवड्यांच्या काळात २६ हजार लोक येण्याची अपेक्षा आहे. त्यामध्ये बहुतांश भारतीय नागरिक असणार आहेत. या हजारो लोकांचे मुंबई विमानतळावर आगमन होताच त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यापासून अन्य सुविधा पुरविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने आता तयारी सुरू केली आहे.संयुक्त अरब अमिरती, कुवेत, कतार, ओमानसारख्या आखाती देशांतून दररोज वीस प्रवासी विमाने मुंबई विमानतळावर येत असतात. तेथून मग हे प्रवासी आपापल्या मुक्कामी जातात.या देशांतून येणाºया सर्व प्रवाशांना १४ दिवस सरकारी रुग्णालयांमध्ये किंवा या प्रवाशांच्या घरीच क्वारंटाइनमध्ये राहावे लागणार आहे. आखाती देशांमध्ये नोकरीसाठी जाणाºयांपैकी बहुतांश लोक हे कुशल कामगार आहेत.क्वारंटाइनमध्ये राहाणे बंधनकारक1कोरोनाच्या साथीमुळे ते आखाती देशांतून मायदेशी परतत आहेत. त्यापैकी ज्यांची मुंबईत किंवा मुंबईच्या जवळपास घरे आहेत त्यांना त्यांच्या घरीच क्वारंटाइनमध्ये १४ दिवस राहाण्याची व या कालावधीत सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.2मात्र जे मुंबईत राहात नाहीत व ज्यांच्यात कोरोनाच्या संसर्गाची लक्षणे दिसत आहेत, अशांना सरकारी रुग्णालये किंवा अन्य ठिकाणी उभारलेल्या क्वारंटाइनमध्ये राहाणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुंबईमध्ये मरोळ विभागात सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन उभारण्यात आले आहे.3सरकारने उभारलेल्या क्वारंटाइनमध्ये ७०० खाटांची सोय करण्यात आली आहे असे राज्य सरकारने सांगितले. शहरातील विविध ठिकाणी हॉटेल, मंगल कार्यालये यांच्यामध्येही सरकारने क्वारंटाइन सुरू करण्यासाठी पावले उचलली आहेत.1कोरोनाच्या साथीमुळे ते आखाती देशांतून मायदेशी परतत आहेत. त्यापैकी ज्यांची मुंबईत किंवा मुंबईच्या जवळपास घरे आहेत त्यांना त्यांच्या घरीच क्वारंटाइनमध्ये १४ दिवस राहाण्याची व या कालावधीत सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.2मात्र जे मुंबईत राहात नाहीत व ज्यांच्यात कोरोनाच्या संसर्गाची लक्षणे दिसत आहेत, अशांना सरकारी रुग्णालये किंवा अन्य ठिकाणी उभारलेल्या क्वारंटाइनमध्ये राहाणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुंबईमध्ये मरोळ विभागात सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन उभारण्यात आले आहे.3सरकारने उभारलेल्या क्वारंटाइनमध्ये ७०० खाटांची सोय करण्यात आली आहे असे राज्य सरकारने सांगितले. शहरातील विविध ठिकाणी हॉटेल, मंगल कार्यालये यांच्यामध्येही सरकारने क्वारंटाइन सुरू करण्यासाठी पावले उचलली आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत