शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

Coronavirus: मोदी सरकारमधील मंत्रीही झाले 'विलग'; कोरोनाची लक्षणं वाटताच स्वतःला केलं दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 12:00 PM

Corona virus: महारा़ष्ट्रामध्ये कोरोनामुळे पहिल्या रुग्णाचा मृृत्यू झाला असून देशातील एकूण मृत्यूंची संख्या तीन झाली आहे. तर शंभराच्यावर कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत.

ठळक मुद्देमहारा़ष्ट्रामध्ये कोरोनामुळे पहिल्या रुग्णाचा मृृत्यू झाला असून देशातील एकूण मृत्यूंची संख्या तीन झाली आहे.केंद्र आणि राज्य सरकारांनी लोकांना गर्दीची ठिकाणे टाळण्याचे आदेश दिले

नवी दिल्ली : जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोना व्हायरसने आता भारतातही मूळ धरायला सुरूवात केली आहे. कोरोनाने दुसºया स्टेजमध्ये प्रवेश केल्याने शाळा, कॉलेज, मॉल बंद ठेवण्यासोबत सरकारी कार्यालये, खासगी कार्यालयामध्ये घरून काम करण्याची विनंती मोदी सरकारने केली होती.

केंद्रीय राज्यमंत्री व्ही मुरलीधरन हे 14 मार्चला त्रिवेंद्रममधील मेडिकल इन्स्टिट्युटमध्ये बैठकीसाठी गेले होते. यावेळी या बैठकीला स्पेनहून परतलेल्या एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने मुरलीधरन यांनी काळजी घेतली आहे. यामुळे परदेशातील मोठमोठ्या नेत््यांना कोरोनाची लागण झालेली असताना भारतातही राजकीय नेत्यांना व्हायरसने वेढले आहे.

मोदी सरकारमधील केंद्रीय राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी स्वत:ला कोरोना संशयित रुग्ण म्हणून घरीच व्कारनटाईन केले आहे. क्वारनटाईन म्हणजे संशयितास 14 दिवसांसाठी अन्य लोकांच्या संपर्कापासून लांब ठेवले जाते. जगभरात अनेक नेत्यांना, त्यांच्या कुटुंबीयांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे हा आजार पसरू नये म्हणून मुरलीधरन यांनी काळजी घेतली आहे. 

मुरलीधरण हे सध्या केरळमधील त्रिवेंद्रममध्ये असून तेथेच त्यांनी विलगीकरण केले आहे. दरम्यान, महारा़ष्ट्रामध्ये कोरोनामुळे पहिल्या रुग्णाचा मृृत्यू झाला असून देशातील एकूण मृत्यूंची संख्या तीन झाली आहे. तर शंभराच्यावर कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारांनी लोकांना गर्दीची ठिकाणे टाळण्याचे आदेश दिले असून मुंबई, पुण्यामध्ये जमाव बंदी आदे़श लागू करण्यात आले आहेत. 

CoronaVirus : 'चीन'पुढे अमेरिकेने हात टेकले; मोठ्या मंदीच्या छायेत असल्याची ट्रम्प यांची घोषणा

 

टॅग्स :corona virusकोरोनाNarendra Modiनरेंद्र मोदीministerमंत्रीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस