CoronaVirus : 'चीन'पुढे अमेरिकेने हात टेकले; मोठ्या मंदीच्या छायेत असल्याची ट्रम्प यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 11:06 AM2020-03-17T11:06:17+5:302020-03-17T11:09:04+5:30

Corona Virus अमेरिकेमध्ये गेल्या काही वर्षांपासून व्यापारयुद्ध रंगले होते. ट्रेड वॉरमध्ये एकमेकांच्या उत्पादनांवर कर वाढविण्यात येत होते. चीनवर जैविक युद्ध छेडण्याचेही आरोप कोरोनामुळे झाले आहेत.

CoronaVirus: US beat by 'China' in trading war?; Trump announces a big recession hrb | CoronaVirus : 'चीन'पुढे अमेरिकेने हात टेकले; मोठ्या मंदीच्या छायेत असल्याची ट्रम्प यांची घोषणा

CoronaVirus : 'चीन'पुढे अमेरिकेने हात टेकले; मोठ्या मंदीच्या छायेत असल्याची ट्रम्प यांची घोषणा

Next
ठळक मुद्देअमेरिकेमध्ये कोरोना व्हायरसच्या प्रभावामुळे दुकाने, मॉल्स, सिनेमागृहे बंद ठेवण्यात आली आहेत. अचानक शटडाऊन झाल्याने बेरोजगारी वाढण्याची भीती स्थानिक वृत्तसंस्थांनी व्यक्त केली आहे.अमेरिकेच्या शेअर बाजारामध्ये मोठी घसरण पहायला मिळत आहे.

वॉशिंग्टन : अमेरिका-चीनमधील शीतयुद्ध गेल्या काही दशकांपासून सुरु आहे. गेल्या 2 वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये व्यापारयुद्धाला सुरुवात झाली होती. यामध्ये अमेरिका आणि चीन हे दोन्ही देश एकमेकांच्या उत्पादनांवर कर लावण्याची स्पर्धा करत होते. आता चीनमधील कोरोना व्हायरसने अमेरकिेची झोप उडविली असून अमेरिकेची अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. एका व्हायरसमुळे बलाढ्य अमेरिकेची पुढील काळात पळता भूई थोडी होणार आहे. 

कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे देशाची अर्थव्यवस्था मंदीच्या दिशेने जाऊ  शकते, असे संकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले. मंदीच्या संदर्भात पत्रकार परिषदेच्या प्रश्नांना ते उत्तर देत होते. मला वाटतं की शेअर बाजार आणि अर्थव्यवस्थेत एक प्रकारची मरगळ आली आहे. परिस्थिती ठीक झाल्यावर पुन्हा एकदा तुम्हाला त्यात प्रचंड वाढ पाहायला मिळणार आहे, असे आश्वाासन ट्रम्प यांनी दिले आहे. 


अमेरिकेमध्ये कोरोना व्हायरसच्या प्रभावामुळे दुकाने, मॉल्स, सिनेमागृहे बंद ठेवण्यात आली आहेत. याचा परिणाम लोकांच्या व्यवसायावर होताना दिसत आहे. अचानक शटडाऊन झाल्याने बेरोजगारी वाढण्याची भीती स्थानिक वृत्तसंस्थांनी व्यक्त केली आहे. लोकांचे उत्पन्न थांबल्याने खर्चही करता येणार नाही. हेच मंदीसाठी मोठे कारण बनणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 


अमेरिकेच्या शेअर बाजारामध्ये मोठी घसरण पहायला मिळत आहे. सोमवारी वॉल स्ट्रीट वरील शेअर बाजार डाऊ जोन्स 3000 अंकांनी घसरला. तर अमेरिकेच्या फेडरल रिझव्ह बँकेने बेंचमार्कव्याजदर 0 ते 0.25 टक्के केला आहे. हा दर आधी 1 ते 1.25 टक्के होता. या आधी 3 मार्चला फेडने 0.5 टक्क््यांची कपात केली होती. फेडने अमरिकेच्या अर्थव्यवस्थेमध्ये 700 अब्ज डॉलर ओतण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये 200 अब्ज डॉलरचे सरकारी बाँड खरेदी करण्यात येणार आहेत.

सोमवारी बाजार उघडताच अमेरिकेच्या शेअर बाजार डाऊ जोन्सने 2748.64 अंकांची घसरण नोंदविली. यामुळे बाजारात लो सर्किट लावल्याने 15 मिनिटांसाठी ट्रेडिंग थांबविण्यात आले होते. 12 मार्च रोजी डाऊ जोन्स येथे लोअर सर्किट बसविण्यात आले. त्याचा परिणाम दुस‍ºयाच दिवशी भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. 13 मार्च रोजी सेन्सेक्स सुरूवातीला 3600 अंकांवर खाली आला होता आणि लो सर्किटमुळे ट्रेडिंग थांबवावे लागले होते.

Web Title: CoronaVirus: US beat by 'China' in trading war?; Trump announces a big recession hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.