शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

CoronaVirus: 'देशाचे पैसे देशालाच देतोय'; निवृत्त लष्करी अधिकाऱ्याकडून ग्रॅच्युटी, पेन्शनचे १५ लाख दान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 11:07 AM

coronavirus पंतप्रधान सहाय्यता निधीला १५ लाखांची मदत

मेरठ: संपूर्ण जगात सध्या कोरोनानं थैमान घातलं आहे. भारतातही कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी देशाला आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे मेरठमध्ये वास्तव्यास असणाऱ्या मोहिंदर सिंह यांनी १५.११ लाख रुपये पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये जमा केले आहेत. लष्करातून ज्युनियर कमीशन ऑफिसर पदावरून निवृत्त झालेल्या मोहिंदर यांनी ग्रॅच्युटी, पेन्शन आणि वेतनातून बचत केलेली सर्व रक्कम कोरोनाशी दोन हात करण्यासाठी देशाला दान केली आहे.मला जे काही मिळालंय, ते याच देशातून मिळालंय. आता देशाला गरज आहे. त्यामुळे देशाचा पैसा मी देशाला परत करतोय, अशा शब्दांत मोहिंदर यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. १९७१ च्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात आपला एक डोळा गमावलेले मोहिंदर सिंह पत्नी सुमन चौधरी यांच्यासोबत राहतात. त्यांनी पत्नीसह पंजाब अँड सिंध बँकेच्या व्यवस्थापकांची भेट घेत मदतीचा धनादेश सुपूर्द केला.माझं वय आता ८५ वर्षे आहे. इतकं पैसे घेऊन मी कुठे जाणार आहे?, असा प्रश्न मोहिंदर यांनी १५ लाख रुपये दान केल्यानंतर विचारला. मी दान केलेली रक्कम लोकांच्या कामी येणार आहे, याचा मला आनंद असल्याचं त्यांनी सांगितलं. मोहिंदर यांना दोन मुलगे असून त्यांची एक मुलगी परदेशात नोकरी करते. मेरठमधील ११ भागांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या जास्त असल्यानं तिथे पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. मेरठमध्ये कोरोनाचे ११ हॉटस्पॉट असून त्यांच्यावर ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून लक्ष ठेवलं जात आहे. घराबाहेर फिरणाऱ्या व्यक्तींवर ड्रोनची नजर असून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. पोलीस कंट्रोल रुममधून ड्रोनद्वारे मिळणाऱ्या दृश्यांवर लक्ष्य ठेवलं जात असल्याची माहिती मेरठचे एडीजी प्रशांत कुमार यांनी दिली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या