शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

coronavirus : अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांनी पाठ फिरवली, रामनामाचा जप करत मुस्लिमांनी माणुसकी दाखवली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 3:23 PM

बुलंदशहर येथील रविशंकर यांचा मृत्यू झाला होता, पण कोरोनाच्या भीतीमुळे नातेवाईकांनीही रविशंकर यांच्या घरी येणं टाळले.

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसचा कहर जगभरात वाढत आहे. भारतात देखील दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. या व्हायरसचा संसर्ग कमी करण्यासाठी संपूर्ण देशात पंतप्रधानांनी लॉकडाऊन घोषित केला आहे. मात्र, काही बेजबाबदार लोकं नियमांचं उल्लंघन करून घराबाहेर पडत आहेत. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या भीतीमुळे एका पतीने समाजहित लक्षात घेऊन पत्नीच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या लोकांना घरी पाठल्याची बाब उघडकीस आली. तर, उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर येथे एका हिंदू व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला मुस्लीम बांधवांनी पुढाकार घेऊन अंत्यविधी पार पाडला. 

बुलंदशहर येथील रविशंकर यांचा मृत्यू झाला होता, पण कोरोनाच्या भीतीमुळे नातेवाईकांनीही रविशंकर यांच्या घरी येणं टाळले. आप्तेष्ठ आणि सगेसोयरेही मृत्युनंतर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढे येईनात. त्यावेळी, रविशंकर यांच्या घराशेजारील मुस्लीम बांधवांनी पुढाकार घेऊन रविशंकर यांच्यावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले. विशेष म्हणजे आपल्या खांद्यावर त्यांचं प्रेय स्मशानभूमीत घेऊ जाताना... राम नाम सत्य है.. असा रामनामाचा जपही या मुस्लीम बांधवांनी केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री शशी थरुर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करत, माहिती दिली. तसेच, हाच आपला भारत. हेच भारताचे स्पीरीट असल्याचे थरुर यांनी म्हटले. तसेच, हीच भारत देशाची कल्पना आहे, याच्या सुरक्षेसाठी, जतन करण्यासाठी आणि प्रतिकारासाठी आपण प्रार्थना करु, असेही थरुर यांनी म्हटले आहे. 

कोरोनामुळे माणुसकी पावला-पावलावर दिसून येत आहे, उपाशी माणसाला अन्न देऊन, भुकेल्याची भूक भागवून नागरिक आपलं कर्तव्य बजावत आहेत. तर, पोलीस आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या कामाचं मोठ्या प्रमाणात कौतुक होतंय. हिंदू-मुस्लीम-शीख-ईसाईसह देश एकत्र आला असून फाईट अगेन्स्ट इंडिया... चा नारा देशवासियांनी दिला आहे. भारतीयांचे हे स्पीरीट पाहिल्यानंतर नक्कीच कोरोनाला लवकरच भारतातून पळवून लावण्यात आपण यशस्वी होऊ शकते, असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. 

 

दरम्यान, आग्रा येथील न्यू विजय नगर कॉलनीतील नगला धानी भागात राहणारे देवकीनंदन त्यागी यांची पत्नी ममता यांचे बुधवारी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. रात्री दहा वाजता त्यांचा मृतदेह रुग्णालयातून घरी आणला. त्यावेळी त्यांचे हितचिंतक आणि जवळचे नातेवाईक जमले होते. त्यावेळी भावनाविवश झालेले पोलीस देखील काही करू शकले नाही. अखेर पतीने मोठा निर्णय घेत सर्वांना घरी परत जाण्यास सांगितले. देश हितासाठी त्याने घेतलेल्या निर्याणाचा जे बेजाबदार विनाकारण घराबाहेर पडतात त्यांनी आदर्श घेतला पाहिजे. पत्नी ममता यांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्काराला लोकांनी गर्दी केली. मात्र,  देवकीनंदन त्यागी यांनी लोकांसमोर हात जोडून लॉकडाऊन असल्यामुळे तुम्ही गर्दी करू नका आणि सगळ्यांनी घरी जा असं सांगितलं आणि केवळ १० नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार केले. तर, दुसरीडे बुलंदशहरमध्ये मुस्लीम बांधवांनी एकत्र येऊन माणूसकी जपत, हिंदू बांधवाच्या अंत्यसंस्कारासाठी घेतलेला पुढाकार हा भारत देशातील विविधतेत नटलेल्या एकतेचं प्रतिक आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbulandshahr-pcबुलंदशहरMuslimमुस्लीमDeathमृत्यूShashi Tharoorशशी थरूर