शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: बाबा रामदेव यांच्या अडचणीत वाढ, परवानगीशिवाय औषधाची चाचणी घेतल्याने होणार कायदेशीर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 14:44 IST

कुठल्याही प्रमाणित वैद्यकीय संस्थेची मान्यता तसेच शासकीय परवानगी न घेता औषध तयार करून प्रसिद्धीस आणल्याने बाबा रामदेव यांनी कोरोनावर आणलेले औषध पहिल्याच दिवशी वादाचा भोवऱ्यात सापडले आहेत.

ठळक मुद्देरामदेव बाबांनी कोरोनावर औषध शोधल्याचा केलेला दावा फ्रॉड, राजस्थान सरकारचा आरोप कोरोनाच्या संकटाच्या काळात बाबा रामदेव यांनी ज्याप्रकारे औषध विकण्याचा दावा केला आहे, ती योग्य बाब नाहीया प्रकरणी कायदेशीर कारवाई करणार, राजस्थान सरकारने दिले संकेत

 जयपूर - पतंजली योगपीठाचे प्रमुख योगगुरू बाबा रामदेव यांना मंगळवारी कोरोनिल हे कोरोनावरील औषध समोर आणून वैद्यकीय जगतामध्ये खळबळ उडवून दिली होती. मात्र कुठल्याही प्रमाणित वैद्यकीय संस्थेची मान्यता तसेच शासकीय परवानगी न घेता हे औषध तयार करून प्रसिद्धीस आणल्याने पहिल्याच दिवशी हे औषध वादाचा भोवऱ्यात सापडले आहेत. आयुष मंत्रालयाने या औषधाच्या जाहीरातीवर बंदी आणलेली असतानाच आता राजस्थान सरकारने कुठल्याही परवानगीशिवाय औषधाची चाचणी घेतल्याने रामदेव बाबांविरुद्ध कायदेशीर कारवाई करून न्यायालयात खटला दाखल करण्याचे संकेत दिले आहेत.रामदेव बाबांनी कोरोनावर औषध शोधल्याचा केलेला दावा हा फ्रॉड असल्याचा आरोप राजस्थान सरकारने केला आहे. याबाबत राजस्थानचे आरोग्यमंत्री रघू शर्मा म्हणाले की, कोरोनाच्या संकटाच्या काळात बाबा रामदेव यांनी ज्याप्रकारे औषध विकण्याचा दावा केला आहे, ती योग्य बाब नाही.  

आयुष मंत्रालयाच्या गॅझेट नोटिफिकेशननुसार बाबा रामदेव यांनी आयसीएमआर आणि राजस्थान सरकारकडून कोरोनाच्या कुठल्याही आयु्र्वेदिक औषधाच्या ट्रायलसाठी परवानगी घेणे आवश्यक होते. मात्र कुठल्याही परवानगीविना कुठल्याही निकषांविना औषधाची चाचणी घेतली गेली आहे. ही बाब चुकीची आहे, असे रघू शर्मा यांनी सांगितले. या प्रकरणी आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत. तसेच आमच्या एका डॉक्टरांनी एक खटला दाखल केला आहे. त्यानुसारसुद्धा कारवाई होई, असे रघू शर्मा यांनी सांगितले.  कोरोनावरील औषधाची क्लिनिकल ट्रायल जयपूरमधील नॅशनल इंस्टिट्युट ऑफ मडिकल सायन्स अँड रिसर्च (निम्स) येथे करण्यात आल्याचे पतंजली रिसर्च फाऊंडेशन ट्रस्टने आयुष मंत्रालयाला सांगितले होते. तसेच आपण सर्व नियमांचे पालन केल्याचा दावा केला होता.हा दावा खोडून काढताना मुख्य वैद्यकिय अधिकाऱ्यांनी सांगितले की, तिथे कुठल्याही औषधाची चाचणी घेण्यासाठी आमच्याकडून परवानगी घेण्यात आली नव्हती. तिथे आम्ही जे रुग्ण भरती केले होते त्यांच्यामध्ये कुठलीही लक्षणे दिसून येत नव्हती. कुणालाही ताप, खोकला किंवा गळ्यात खवखव नव्हती. असे सर्व रुग्ण ७ ते १० दिवसांत बरे झाले. तसेच अन्य ठिकाणी ठेवलेले असे रुग्णसुद्धा पुढच्या काही दिवसांत बरे झाले.

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाcorona virusकोरोना वायरस बातम्याRajasthanराजस्थानIndiaभारतMedicalवैद्यकीय