Coronavirus : प्रेरणादायी! ...म्हणून 6 महिन्यांच्या चिमुकलीला कुशीत घेऊन आई करतेय काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 13:46 IST2020-04-06T13:36:15+5:302020-04-06T13:46:40+5:30
Coronavirus : कोरोना व्हायरसपासून रुग्णांचा बचाव करता यावा यासाठी सर्वच क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहे.

Coronavirus : प्रेरणादायी! ...म्हणून 6 महिन्यांच्या चिमुकलीला कुशीत घेऊन आई करतेय काम
भोपाळ - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक उपाययोजना सुरू आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन सुरू आहे. भारतात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. सोमवारी आरोग्य मंत्रालयाकडून दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोना रुग्णांची संख्या 4000 हून अधिक झाली आहे. गेल्या 24 तासांत 32 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 693 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोना व्हायरसपासून रुग्णांचा बचाव करता यावा यासाठी सर्वच क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहे. अशीच प्रेरणादायी घटना समोर आली आहे.
कोरोनाचं संकट देशावर असताना वीजेचं संकट ओढावू नये यासाठी वीज केंद्राचे कर्मचारी काम करत आहेत. याच दरम्यान एक महिला कर्मचारी आपल्या अवघ्या सहा महिन्यांच्या चिमुकलीला घेऊन वीजपुरवठा कक्षात काम करत आहे. प्रगती तायडे असं महिला कर्मचाऱ्याचं नाव असून त्या आपल्या चिमुकलीसह आपलं कर्तव्य पार पाडत आहेत. भोपाळच्या कोलार सब-स्टेशनमध्ये टेस्टिंग ऑपरेटर म्हणून त्या काम करतात. वीज केंद्रात येताना त्या आपल्या सहा महिन्यांच्या मुलीलाही सोबत घेऊन येतात आणि आपलं कर्तव्यही निभावतात.
वीज केंद्रात काम करणाऱ्या प्रगती सध्या 'करोना वॉरियर'आहेत. सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत त्या ड्युटीवर असतात. चिमुकलीला घरी एकटं सोडू शकत नाही. त्यामुळे तिला सोबत आणण्याशिवाय पर्याय नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे आपलं कर्तव्यही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्या सहा महिन्यांच्या चिमुकलीला घेऊन सकाळीच कार्यालयात दाखल होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच 'कठीण प्रसंगातही डॉक्टर, नर्स आणि पोलीस आपापलं कर्तव्य निभावत आहेत. अशा वेळी मी घरी कशी बसू शकते?, कोणाच्याही घरी अंधार पडू नये, यासाठी मला माझं कर्तव्य बजावणं आवश्यक आहे' असं प्रगती यांनी म्हटलं आहे. सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे.
Coronavirus : कौतुकास्पद! कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी 8 महिन्यांच्या गर्भवती नर्सचा तब्बल 250 किमीचा प्रवासhttps://t.co/PEku5cEEue#coronaupdatesindia#coronavirusindia
— Lokmat (@MiLOKMAT) April 5, 2020
डॉक्टर आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी तत्पर असलेले पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांवर उपचार करता यावे यासाठी 8 महिन्यांच्या गर्भवती नर्सने तब्बल 250 किमीचा प्रवास केल्याची प्रेरणादायी घटना समोर आली आहे. तामिळनाडूमध्ये ही घटना घडली आहे. विनोथिनी असं या 25 वर्षीय नर्सचं नाव असून ती 8 महिन्यांची गर्भवती आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी तिने तामिळनाडूतील तिरुचिरा ते रामनाथुरमपर्यंत तब्बल 250 किमी अंतर प्रवास केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus: कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी पंतप्रधानांच्या भाजपा कार्यकर्त्यांना पाच महत्त्वाच्या सूचना
CoronaVirus : देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा ४००० पार, २४ तासांत ३२ जणांचा मृत्यू