CoronaVirus : देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा ४००० पार, २४ तासांत ३२ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 10:21 AM2020-04-06T10:21:56+5:302020-04-06T10:23:08+5:30

CoronaVirus : गेल्या २४ तासांत ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६९३ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत.

coronavirus latest total case in india; covid19 total death in country rkp | CoronaVirus : देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा ४००० पार, २४ तासांत ३२ जणांचा मृत्यू

CoronaVirus : देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा ४००० पार, २४ तासांत ३२ जणांचा मृत्यू

Next

नवी दिल्ली : भारतात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा संख्या वाढत चालली आहे. सोमवारी आरोग्य मंत्रालयाकडून दिलेल्या माहितीनुसार देशात कोरोनाच्या रुग्णांचा संख्या ४ हजारहून अधिक झाली आहे.

भारतात कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत १०९ लोकांचा मृत्यू झाला असून ४०६७ लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर २३२ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. गेल्या २४ तासांत ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६९३ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक उपोययोजना सुरु आहे. तसेच, कोरोनावर मात करण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊन १४ एप्रिलपर्यंत असणार आहे.

रविवारी आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत कोरोनाची ५०५ लोकांना बाधा आणि ११ लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. यासोबतच रविवारी देशातातील कोरोनाची संख्या ३,५७७ इतकी होती, तर ८३ लोकांचा मृत्यू झाला होता.

याचबरोबर, महाराष्ट्रात रविवारी २४ तासांत कोरोनाच्या ११३ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने बाधितांची संख्या ७४८ झाली आहे. तसेच, रविवारी कोरोनामुळे झालेल्या मृतांचा आकडा ४६ वर जाऊन पोहोचला.

शाळा, कॉलेज उघडण्याचा निर्णय १४ एप्रिलनंतरच
कोरोनामुळे बंद केलेली देशभरातील शाळा-कॉलेजे पुन्हा सुरु करण्याचा निर्णय ‘लॉकडाऊन’ १४ एप्रिलला संपल्यावर परिस्थिती कशी आहे, याचा आढावा घेऊनच केला जाऊ शकेल, असे केंद्रीय मानवसंधान विकासमंत्री रमेश पोखरीयाल यांनी म्ह्टले आहे. ते म्हणाले की, सरकारच्या दृष्टीने विद्यार्थी व शिक्षकांची सुरक्षा ही सर्वोच्च बाब आहे. १४ एप्रिलनंतरही शाळा-कॉलेजे बंद ठेवावी लागली तरी विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी सरकार घेणार आहे.
 

Web Title: coronavirus latest total case in india; covid19 total death in country rkp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.