शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : ‘लॉकडाऊन’ बाधितांसाठी १.७० लाख कोटींचे पॅकेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 05:39 IST

CoronaVirus : केंद्रीय अर्थसंकल्पाव्यतिरिक्त देशावर आलेल्या आपत्तीच्या काळात सरकारकडून केला जाणारा आजवरचा हा सर्वात मोठा खर्च आहे.

नवी दिल्ली : कोरोनाची भयावह साथ रोखण्यासाठी सध्या लागू असलेले देशव्यापी ‘लॉकडाऊन’ व त्याआधीपासून विविध राज्यांमध्ये लागू केलेलेविविध निर्बंध यामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व अशा आर्थिक संकटाची झळ बसणाऱ्या सुमारे ८० कोटी जनतेला अनेक प्रकारे मदतीचा हात देण्यासाठी केंद्र सरकारने पुढील तीन महिन्यांसाठी १ लाख ७० हजार कोटी रुपये खर्चाचे ‘पॅकेज’ बुधवारी जाहीर केले. केंद्रीय अर्थसंकल्पाव्यतिरिक्त देशावर आलेल्या आपत्तीच्या काळात सरकारकडून केला जाणारा आजवरचा हा सर्वात मोठा खर्च आहे.केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी एका पत्रकार परिषदेत या पॅकेजची घोषणा करताना, याचा लाभ देशातील सुमारे दोनतृतीयांश जनतेला होईल, असे सांगितले आणि यापैकी कोणालाही उपाशी राहावे लागणार नाही, अशी ग्वाहीदिली. पॅकेजमधील सर्व तरतुदी तात्काळ लागू होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.५0 लाखांचा आरोग्य विमा- कोरोना प्रतिबंध व उपचार याच्याशी संबंधित काम करणारे सर्व डॉक्टर, नर्स, अन्य आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, ‘आशा’ योजनेचे कर्मचारी व अन्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येकी ५० लाख रुपयांचा आरोग्य विमा.- गरीब कल्याण अन्न योजना : याआधी रेशनवर दिलेल्या पाच किलो गहू किंवा तांदळाखेरीज पुढील तीन महिने प्रत्येक व्यक्तीला आणखी पाच किलो गहू किंवा तांदूळ. याखेरीज प्रत्येक कुटुंबास पसंतीनुसार एक किलो डाळ. हे जादा धान्य दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना पूर्णपणे विनामूल्य मिळेल. हे धान्य लाभार्थी रेशन दुकानांतून दोन वेळा मिळून घेऊ शकतील.- महिला बचत गटांना विनातारण कर्ज : ‘लाईव्हलीहूड मिशन’साठी काम करणाºया महिला बचत गटांना देण्यात येणाºया विनातारण कर्जाच्या मर्यादेत १० लाख रुपयांवरून २० लाख रुपये अशी वाढ.- तीन महिने विनामूल्य गॅस सिलिंडर : दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांसाठी असलेल्या ‘उज्ज्वला’ योजनेत नोंदणी झालेल्या सुमारे आठ कोटी कुटुंबांना पुढील तीन महिने स्वयंपाकाच्या गॅसचा सिलिंडर विनामूल्य.तीन महिने ‘पीएफ’ दिलासाप्रोव्हिडंट फंडाची वर्गणी : कामगार भविष्य निर्वाह योजनेत नोंदणी असलेल्या ज्या आस्थापनांमध्ये १०० पर्यंत कामगार- कर्मचारी असतील व त्यातील ९० टक्के कामगार- कर्मचाºयांचा मासिक पगार १५ हजार रुपयांहून कमी असेल, तर अशा सर्व कामगारांच्या प्रोव्हिडंट फंडाच्या मासिक वर्गणीचा कामगार व मालक, अशा दोघांचाही हिस्सा पुढील तीन महिने सरकार भरेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन