शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : वृत्तपत्रे, वृत्त वाहिन्यांचे कामकाज विनाअडथळा सुरू राहिले पाहिजे, माहिती व प्रसारण मंत्रालयाचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 05:30 IST

coronavirus : २३ मार्च रोजी मंत्रालयाने केंद्रशासित प्रदेश व राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘‘वृत्तसंस्था आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांसारखे भक्कम माहिती प्रसारित करणारे नेटवर्क्स हे खरी, विश्वसनीय माहिती वेळेवर पोहोचेल यासाठी फारच महत्त्वाचे आहे.’’

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा उद्रेक झाल्याच्या परिस्थितीत वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे कामकाज विनाअडथळा सुरू राहील याची काळजी घ्यावी, असे आवाहन माहिती आणि प्रसारण (आय अँड बी) मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केले आहे.२३ मार्च रोजी मंत्रालयाने केंद्रशासित प्रदेश व राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘‘वृत्तसंस्था आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांसारखे भक्कम माहिती प्रसारित करणारे नेटवर्क्स हे खरी, विश्वसनीय माहिती वेळेवर पोहोचेल यासाठी फारच महत्त्वाचे आहे.’’ जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठीच माहितीचे हे जाळे योग्यरीत्या काम करणे आवश्यक आहे, असे नाही तर संपूर्ण देशाला ताज्या घडामोडींची माहिती देण्यासाठीही गरजेचे आहे. खोट्या आणि बनावट बातम्या टाळणे आवश्यक आहे.राज्य सरकारांनी आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनाने या सेवा सुरळीत सुरू राहतील याची खात्री करावी. दूरचित्रवाणी वाहिन्या (टीव्ही चॅनल्स), वृत्तसंस्था, टेलिपोर्ट आॅपरेटर्स, डिजिटल सॅटेलाईट न्यूज गॅदरिंग, डीटीएच (डायरेक्ट टू होम) आणि हायएंड-इन-द-स्काय, मल्टी सिस्टीम आॅपरेटर्स, केबल आॅपरेटर्स, फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन (एफएम) रेडिओ आणि कम्युनिटी रेडिओ स्टेशन्स आदींचा यात समावेश आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याचा विचार असल्यास वरील सेवा, संस्थांची साखळी कोणताही अडथळा न येता सुरू राहण्यास परवानगी असली पाहिजे, असे पत्रात म्हटले आहे. प्रसारमाध्यमांच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी वाहनांच्या हालचाली, त्यांना गरज भासल्यास इंधनाची व्यवस्था करावी, विनाअडथळा वीजपुरवठा व इतर अनुषंगिक आवश्यक गोष्टी त्या त्या संस्थांनी मागितल्यास द्याव्यात, असेही त्यात म्हटले.वृत्तपत्रांवर विश्वास ठेवाकोरोना विषाणूबद्दल आम्हाला सगळे काही माहिती नसल्यामुळे चुकीची माहिती मोठ्या प्रमाणावर पसरते. त्यातील काही लोकांच्या मनात खोलवर जाऊन बसते. वृत्तपत्रे मात्र अशा घातक विषाणूचा फैलाव करीत नाहीत याची याद्वारे खात्री दिली जात आहे. जागतिक आरोग्य संघटना, सीडीसी, अनेक नामवंत डॉक्टर्स आणि आघाडीच्या अतिसूक्ष्म विषाणूतज्ज्ञांनीही वृत्तपत्रांवरील हा आरोप खोडून काढला आहे. एवढेच काय केंद्र आणि राज्य सरकारांनीही वृत्तपत्रांना अत्यावश्यक सेवेत ठेवले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या