शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

CoronaVirus News : सोनिया गांधींनी काँग्रेसशासित राज्यांच्या कोरोनास्थितीचा घेतला आढावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 1:18 AM

Sonia Gandhi : पंजाबमध्ये पाच दिवस पुरेल एवढाच लसींचा साठा शिल्लक असून छत्तीसगडमध्ये तीन दिवसांचा साठा शिल्लक असल्याचे अनुक्रमे अमरिंदर आणि बघेल यांनी सांगितले.

नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शनिवारी काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून कोरोनास्थितीचा आढावा घेतला. केंद्र सरकार देशातील कोरोनास्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याची टीका यावेळी सोनिया गांधी यांनी केली. या आभासी बैठकीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आदि उपस्थित होते. पंजाबमध्ये पाच दिवस पुरेल एवढाच लसींचा साठा शिल्लक असून छत्तीसगडमध्ये तीन दिवसांचा साठा शिल्लक असल्याचे अनुक्रमे अमरिंदर आणि बघेल यांनी सांगितले. आपापल्या राज्यातील जनतेला अधिकाधिक लसी कशा मिळतील, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन सोनिया गांधी यांनी यावेळी केले. तसेच राज्यामध्ये कोरोनाचा फैलाव होणार नाही, यासाठी काळजी घेण्याचा सल्लाही सोनिया यांनी यावेळी दिला. केंद्र सरकार देशात कोरोनास्थिती हाताळण्यात अपयशी ठरले असून काँग्रेसशासित राज्यांनी आपल्या प्रयत्नात कसूर करू नये, असा आदेशही सोनिया गांधी यांनी यावेळी दिला. 

केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळेच कोरोनाची दुसरी लाट - राहुल गांधी      देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका करताना म्हटले आहे की, सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे.     कोरोना साथीच्या काळात आम आदमीच्या हातात पैसे देण्याचे आवाहन करताना राहुल गांधी म्हणाले की, या गर्विष्ठ सरकारला सूचनांचीही ॲलर्जी आहे. राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, सरकारने लसीकरणाला गती द्यावी आणि स्थलांतरीत कामगारांच्या हातात पैसा द्यावा.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcorona virusकोरोना वायरस बातम्या