शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
5
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
6
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
7
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
8
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
9
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
10
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
11
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
12
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
13
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
14
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
15
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
16
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
17
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
18
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
19
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
20
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य

CoronaVirus News : राष्ट्रीय स्तराच्या तुलनेत दिल्लीत घटले रुग्णवाढीचे प्रमाण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 5:21 AM

२९ जून ते १२ जुलै या पंधरवड्यात दिल्ली व राष्ट्रीय स्तरावरील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीची तुलना करता दिल्लीने मिळविलेले यश लक्षात येते.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : संपूर्ण देशात रविवारी एका दिवसात २८,६३७ इतक्या विक्रमी संख्येने रुग्ण सापडले असतील किंवा ५५१ बळी गेले असले तरी या आकडेवारीच्या दिल्लीने रुग्णवाढीचे प्रमाण कमी करण्यात यश मिळविले आहे तसेच या राज्यात कोरोना चाचण्यांचे प्रमाणही वाढले आहे.२९ जून ते १२ जुलै या पंधरवड्यात दिल्ली व राष्ट्रीय स्तरावरील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीची तुलना करता दिल्लीने मिळविलेले यश लक्षात येते. या कालावधीत देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत ६.२ टक्क्यांवरून ७.३ टक्के इतकी वाढ झाली. देशात २९ जूनला कोरोनाचे ७.१३ लाख रुग्ण होते. हाच आकडा १२ जुलैला ८.४९ लाखांवर जाऊन पोहोचला. मात्र दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत २.१ टक्क्यांनी घट झाली. तिथे या रुग्णांचे १६.७ टक्के असलेले प्रमाण घसरून १४.१ टक्के झाले आहे. याच पंधरवड्यात दिल्लीमध्ये करण्यात आलेल्या कोरोना चाचण्यांची संख्या ४.९८ लाखांवरून ७.४७ लाखांपर्यंत वाढली. दिल्लीमध्ये २९ जून रोजी २०८४ नवे रुग्ण आढळले होते. ते प्रमाण १२ जुलै रोजी १८७१ पर्यंत खाली घसरले आहे. दिल्लीत २९ जून रोजी या आजाराने ६५ जण मरण पावले होते तर ५ जुलै रोजी हा आकडा ७१ पर्यंत वाढला व १२ जुलैला तो खाली घसरून ३४ झाला. याच कालावधीत २९ जून रोजी देशामध्ये मरण पावलेल्यांची संख्या ४१८ होती व १२ जुलै रोजी ही संख्या ५५१ इतकी नोंदविली गेली. देशात सध्या दररोज सुमारे ३ लाख कोरोना चाचण्य होत असून रविवारी या चाचण्यांनी १.१५ कोटीचा आकडा पार केला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व मनपा हे एकजुटीने लढा देत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या