CoronaVirus News: Corona virus in the country; From 1 lakh to 2 lakh patients in 15 days, but 'this' thing is heartening | CoronaVirus News: देशात कोरोनाचा कहर; 15 दिवसांत 1 लाखहून 2 लाखवर पोहोचले रुग्ण, पण 'ही' गोष्ट ठरतेय दिलासादायक

CoronaVirus News: देशात कोरोनाचा कहर; 15 दिवसांत 1 लाखहून 2 लाखवर पोहोचले रुग्ण, पण 'ही' गोष्ट ठरतेय दिलासादायक

ठळक मुद्देदेशातील कोरोनाबाधितांची संख्या एक लाखपर्यंत पोहोचण्यासाठी 108 दिवस लागले होते.गेल्या केवळ 15 दिवसांतच कोरोनाबाधितांचा आकडा एक लाखवरून दोन लाखवर गेला आहे.आता देशातील एकूण रुग्णांची संख्या 2 लाख 7 हजार 615 झाली आहे.


CoronaVirus Marathi News total number of corona positive cases on 2 lac

नवी दिल्ली : देशतील कोरोनाबाधितांची संख्या 2 लाखवर पोहोचली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, गेल्या केवळ 15 दिवसांतच हा आकडा एक लाखवरून दोन लाखवर गेला आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या एक लाखपर्यंत पोहोचण्यासाठी 108 दिवस लागले होते. मात्र, असे असतानाही दिलासादायक गोष्ट म्हणजे कोरोनातील ठणठणीत होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे.

अभिमानास्पद! कोरोना व्हॅक्सीन बनवणाऱ्या ऑक्सफर्डच्या टीममध्ये भारताची कन्या, बजावतेय महत्वाची भूमिका

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 19 मेरोजी सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील कोरोना बाधितांची संख्या 1 लाख 1 हजार 139 एवढी होती, यापैकी 3163 जणांचा मृत्यू झाला होता. 15 दिवसांनंतर म्हणजे आज देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाखच्याही पुढे गेला आहे. याचाच अर्थ आता देशातील कोरोनारुग्णांची संख्या दुपट होण्याचा वेग 15 दिवस झाला आहे.

कोरोनाने अमेरिकेत घेतले 1 लाखहून अधिक बळी, नेमकी कुठे झाली 'सुपरपावर'ची चूक

आरोग्य मंत्रालयाने 3 जूनला सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आता देशातील एकूण रुग्णांची संख्या 2 लाख 7 हजार 615 झाली आहे. यापैकी 5 हजार 815 जणांचा मृत्यू झाला. तर यापैकी 50 टक्के म्हणजेच तब्बल 1 लाख 303 लोक कोरोनातून ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. तर आता देशात अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या 1 लाख 1 हजार 497 झाली आहे.

CoronaVirus News: मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या 'या' औषधांसंदर्भात WHOने दिला गंभीर इशारा; होतील अधिक मृत्यू!

रिकव्हरी रेट वाढला -
एकीकडे कोरोना रुग्णांत वाढ होत असतानाच, दुसरीकडे रिकव्हरी रेटदेखील वाढत आहे. 19 मेरोजी 1 लाखहून अधिक कंफर्म रुग्णांपैकी 39 हजार जण बरे झाले आहेत. याचा अर्थ 19 मेपर्यंत रिकव्हरी रेट 40 टक्के होता. तर 3 जूनपर्यंत 2 लाख कंफर्म रुग्णांपैकी एकलाखहून अधिक रुग्णांनी  कोरोनावर मात केली असून, ते बरे होऊन घरी परतले आहेत. याचाच अर्थ आता रिकव्हरी रेट 50 टक्क्यांवर पोहोचला आहे.

"चीनला 'बॅन' करा, उद्योग-धंदे भारतात हलवा"; अमेरिका तयार करत आहे 'मास्टर प्लॅन'

English summary :
CoronaVirus Marathi News and Live Updates: total number of corona positive cases on 2 lac.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus News: Corona virus in the country; From 1 lakh to 2 lakh patients in 15 days, but 'this' thing is heartening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.