शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: धक्कादायक! रुग्णवाहिका आली, कर्मचारी उतरले अन् कोरोना बाधितांचे मृतदेह नदीत फेकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 19:18 IST

CoronaVirus News: संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल; परिसरात खळबळ

कटिहार: देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं सर्वांची चिंता वाढवली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. अनेक राज्यांमधील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील स्थितीदेखील दिवसागणिक बिघडत चालली आहे. अनेक कोरोना रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. याशिवाय कित्येक मृतदेहांवर व्यवस्थित अंत्यसंस्कारदेखील होत नसल्याचं चित्र देशभरात पाहायला मिळत आहे. बिहारच्या बक्सरमध्ये जवळपास शंभरहून अधिक मृतदेह गंगा नदीत आढळून आले असताना आता कटिहारमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.आत्महत्येसाठी १२० किमी प्रवास; पुलावरून एकाचवेळी ५ जणांच्या उड्या, पण पुढे वेगळंच घडलंकटिहारमधील एका रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी कोरोना बाधितांचे मृतदेह नदीत फेकल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये रुग्णालयाचे कर्मचारी मृतदेहांना रुग्णवाहिकेतून बाहेर काढताना दिसत आहेत. त्यानंतर ते मृतदेहांना नदीत टाकतानाही दिसत आहेत. मृत्यूनंतरही रुग्णांचे हाल संपलेले नाहीत. त्यांच्या मृतदेहांची अतिशय असंवेदनशीलपणे विल्हेवाट लावली जात आहे. या व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हा प्रशासनानं घटनेच्या तपासाचे आदेश दिले.ज्याची कोरोना टेस्ट होतेय, 'तो' पॉझिटिव्ह येतोय; 'हा' जिल्हा सगळ्यांची चिंता वाढवतोयप्रशासनानं रुग्णालयाच्या सिव्हिल सर्जनना नोटीस बजावली आहे. २४ तासांत अहवाल पाठवण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. घटनेची चौकशी करून कारवाई करण्यात येईल अशी माहिती प्रशासनानं दिली आहे. गेल्या दोन दिवसांत गंगा नदीपात्रात १०० पेक्षा अधिक मृतदेह तरंगताना आढळून आले आहेत. हे मृतदेह उत्तर प्रदेशातून वाहून आल्याची माहिती बिहारमधील बक्सर प्रशासनानं दिली. यावरून बिहार विरुद्ध उत्तर प्रदेश प्रशासन असा वाददेखील पाहायला मिळाला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या