शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
5
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
6
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
7
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
8
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
9
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
10
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
11
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
12
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
13
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
14
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
15
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
16
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
17
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

CoronaVirus : कोरोनावर मात करण्यासाठी मोदी सरकारची 'टीम-११'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 8:50 AM

CoronaVirus : आतापर्यंत देशात ११३९ लोक कोरोना बाधित झाले आहेत.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार माजला आहे. देशात सुद्धा कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आतापर्यंत देशात ११३९ लोक कोरोना बाधित झाले आहेत. तर यामुळे ३० जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाचा सामना करण्यासाठी ११ समितींची स्थापना केली आहे. या समितींची जबाबदारी कोरोनामुळे आलेल्या आपत्तीशी लढण्यासाठी तयारी करण्याची आहे.  

गृह मंत्रालयामार्फत रविवारी या समित्यांची स्थापना करण्यात आली. या समित्यांमध्ये मोदी सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. पहिली समिती मेडिकल इमर्जन्सी मॅनेजमेंट प्लॅनसाठी तयार करण्यात आली आहे. याची जबाबदारी नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. पॉल यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.  याशिवाय, दुसरी समिती हॉस्पिटल, आयसोलेशन आणि क्वारंटाइनची उपलब्धता आणि आजारावर देखरेख, टेस्टिंग आणि क्रिटिकल केअर ट्रेनिंगसाठी तयार करण्यात आली आहे. तसेच, मेडिकल उपकरणे, रुग्णांना जेवण आणि औषधांची सुविधा, प्रायव्हेट सेक्टर व एनजीओसोबत को-ऑर्डिनेशन आणि लॉकडाउनसंबंधी समित्या तयार करण्यात आल्या आहेत. 

जगात कोरोना रुग्णांची संख्या ७ लाखांकडे; मृतांचा आकडा वाढलाजगभरातील १९९ देशांमध्ये पसरलेल्या कोरोनाने आतापर्यंत ३२,२०० जणांचा बळी घेतला आहे. बाधित रुग्णांची संख्या ६ लाख ८५ हजारांवर म्हणजेच ७ लाखांच्या दिशेने पोहोचली आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे तब्बल १ लाख ४७ हजार रुग्ण बरे झाले आहेत. आज अखेर ५ लाख ६ हजार ५०० जणांवरती विविध देशांत उपचार सुरू आहेत.अमेरिकेमध्ये कोरोनाच्या चाचण्या जोरात सुरू असून, तेथील रुग्णांची संख्या जवळपास सव्वालाखांवर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत अमेरिकेत ८०० नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले. तसेच आतापर्यंत या आजाराने सुमारे २,२५० लोकांचा बळी गेला आहे.इटलीमधील मृतांचा आकडा १० हजारांवर गेला असून, तेथे सुमारे ९३ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याखालोखाल स्पेनमध्ये जवळपास ७९ हजार एवढे बाधित रुग्ण आहेत. गंभीर बाब म्हणजे गेल्या २४ तासांत तेथे ५,५०० हून अधिक जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मृतांचा आकडा ६,५२५ एवढा झाला आहे.स्पेनच्या राजकन्येचेही कोरोनामुळे निधन झाल्याने संपूर्ण देशात भीतीचे वातावरण आहे. हीच स्थिती जर्मनीमध्ये आहे. कोरोनामुळे देशाचे काय होईल, या विवंचनेतून जर्मनीमधील एका मंत्र्याने आत्महत्या केली. तेथील रुग्णांची संख्या जवळपास ५९ हजार झाली असून, त्यामध्ये नवीन रुग्ण ५५० एवढे आहेत. आतापर्यंत जर्मनीत ४५५ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

बेल्जियम, फ्रान्स, ब्रिटनमध्ये संख्या वाढलीफ्रान्स, ब्रिटन, नेदरलँड, बेल्जियम, या देशांमध्येही कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत चालली आहे. फ्रान्समध्ये कोरोनाच्या बळींची संख्या २३०० वर गेली आहे तर ब्रिटनमध्ये १२०० हून अधिक आहे. या दोन देशांत मिळून कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५७ हजारांहून अधिक आहे. नेदरलँड आणि बेल्जियम या दोन्ही देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण प्रत्येकी ११ हजार आहेत. परंतु तेथे मृतांची संख्या तुलनेने खूप कमी आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी