शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

CoronaVaccine: भारतात कोरोना लशीचे दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यातील परीक्षण सुरू, 'या' 17 ठिकाणांची करण्यात आली निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 21:32 IST

परीक्षणात सहभागी होणाऱ्या एकूण 1,600 योग्य स्वयंसेवकांपैकी 400 जण इम्युनोजेनेसिटी कॉहोर्टचा भाग असतील आणि त्यांच्यावर 3:1 या प्रमाणात COVISHIELD अथवा ऑक्सफोर्ड/AZ-ChAdOx1 nCoV-19 चे परीक्षण केले जाईल.

ठळक मुद्देहे परीक्षण 18 वर्ष अथवा त्याहून अधिक वय असलेल्या 1,600 स्वयंसेवकांवर करण्यात येईल. देशातील एकूण 17 ठिकाणांवर या लशींच्या परीक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. महाराष्ट्रात पुणे, मुंबई आणि नागपूरमध्ये हे परीक्षण होणार आहे.

नवी दिल्ली - भारतातील औषध निर्माता कंपनी सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाने कोरोना लशीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलला सुरुवात केली आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) परवानगी दिल्यानंतर कंपनीने लशीच्या परीक्षणाला सुरुवात केली आहे. हे परीक्षण 18 वर्ष अथवा त्याहून अधिक वय असलेल्या 1,600 स्वयंसेवकांवर करण्यात येईल. 

देशातील 17 ठिकाणांवर लशीच्या परीक्षणाची व्यवस्था -देशातील एकूण 17 ठिकाणांवर या लशींच्या परीक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. यात, आंध्र मेडिकल कॉलेज (विशाखापट्टनम), जेएसएस अॅकॅडमी ऑफ हायर एजुकेशन अँड रिसर्च, (म्हैसूर), सेठ जीएस मेडिकल कॉलेज आणि केईएम हॉस्पिटल (मुंबई), केईएम हॉस्पिटल रिसर्च सेंटर (वडू), बीजे मेडिकल कॉलेज आणि ससून जनरल हॉस्पिटल (पुणे), अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (जोधपूर), राजेंद्र मेमोरियल रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायंसेस, (पाटणा), इंस्टिट्यूट ऑफ कम्युनिटी मेडिसिन (मद्रास), पोस्ट ग्रेजुएट इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल एजुकेशन अँड रिसर्च (PGIMER), भारती विद्यापीठ डिम्ड विश्वविद्यालय मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय (पुणे), जहांगीर रुग्णालय (पुणे), एम्स (दिल्ली), आयसीएमआर - विभागीय वैद्यकीय संशोधन केंद्र (गोरखपूर), टीएन मेडिकल कॉलेज आणि बीवायएल नायर रुग्णालय (मुंबई), महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था (सेवाग्राम) आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज (नागपूर) यांचा समावेश आहे.

परीक्षणात सहभागी होणाऱ्या एकूण 1,600 योग्य स्वयंसेवकांपैकी 400 जण इम्युनोजेनेसिटी कॉहोर्टचा भाग असतील आणि त्यांच्यावर 3:1 या प्रमाणात COVISHIELD अथवा ऑक्सफोर्ड/AZ-ChAdOx1 nCoV-19 चे परीक्षण केले जाईल.

यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) मंगळवारी एका पत्रकार परिषदेत घेतली होती. यावेळी आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण, नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल आणि आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव उपस्थित होते. यावेळी देशातील कोरना व्हायरसवरील लशींसंदर्भात माहिती देण्यात आली.

यावेळी नीती आयोगाचे सदस्य डॉक्टर पॉल यांनी सांगितले होते, की सध्या तीन कोरोना लशींवर काम सुरू आहे. या सर्व लशी, परीक्षणाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत. यावेळी त्यांनी माहिती दिली होती, की या तीन लशींपैकी एका लशीचे तिसऱ्या टप्प्यावरील परीक्षण आज-उद्या सुरू करण्यात येईल. मात्र, त्यांनी या लशीच्या नावाचा उल्लेख केला नव्हता. तसेच इतर दोन लशी प्रत्येकी परीक्षणाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यावर आहेत, असेही त्यांनी सांगितले होते.

तत्पूर्वी, स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लाल किल्ल्यावरून भारतात तीन लशींवर काम सुरू आहे, अशी माहिती दिली होती.  

सध्या देशात, भारत बायोटेक-ICMR च्या कोव्हॅक्सिन (Covaxin), झायडस कॅडिलाची झायकोव्ह-डी (Zykov-D) आणि ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेकाची कोविशील्‍ड (Covishield) या तीन लशी परीक्षणाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत. भारतात कोविशिल्डचे तिसऱ्या टप्प्यावरील परीक्षण सीरम इंडियाद्वारे केले जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVirus Vaccine : पाकिस्तान कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षणासाठी तयार!

15 ऑगस्टला पंतप्रधान मोदींनी लडाखवरून सुनावलं; आता अशी आली चीनची प्रतिक्रिया

CoronaVirus News: लोकांना संक्रमित करण्यासाठी अमेरिका तयार करतोय नवा कोरोना व्हायरस!

CoronaVirusVaccine : रशियन कोरोना लसीची अमेरिकेने उडवली खिल्ली, म्हणाले - माकडा लायकही नाही!

CoronaVaccine: पश्चिमेकडील देशांना रशियाचं थेट प्रत्युत्तर; सांगितलं, 'या'मुळे खास आहे Sputnik V लस

CoronaVaccine: रशियन कोरोना लसीला जगभरातून जबरदस्त मागणी, 20 देशांकडून मिळाली 1 अब्ज डोसची ऑर्डर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसmedicineऔषधंPuneपुणेMumbaiमुंबई