CoronaVirus News : अरे व्वा! साडी खरेदीवर महिलांना मिळतंय खास 'कोरोना कवच'; जाणून घ्या 'हे' नेमकं आहे तरी काय? 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 12:02 PM2020-06-18T12:02:57+5:302020-06-18T12:03:07+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: साडी खरेदी केल्यानंतर महिलांना जास्त फायदा होणार आहे. 

CoronaVirus Marathi News saree industry offering free corona kavach | CoronaVirus News : अरे व्वा! साडी खरेदीवर महिलांना मिळतंय खास 'कोरोना कवच'; जाणून घ्या 'हे' नेमकं आहे तरी काय? 

CoronaVirus News : अरे व्वा! साडी खरेदीवर महिलांना मिळतंय खास 'कोरोना कवच'; जाणून घ्या 'हे' नेमकं आहे तरी काय? 

Next

सूरत - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा तब्बल साडे तीन लाखांच्या वर गेला आहे. तर आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊनमधील काही नियम हे शिथिल करण्यात आले असून हळूहळू सर्व दुकानं सुरू करण्यात येत आहे. याच दरम्यान साडी खरेदीवर महिलांना खास 'कोरोना कवच' मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता साडी खरेदी केल्यानंतर महिलांना जास्त फायदा होणार आहे. 

कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी सूरतमधील व्यापाऱ्यांनी हा नवा उपक्रम सुरू केला आहे. साडी खरेदी करा आणि कोरोनाविरोधात लढा या मिशनअंतर्गत सूरतमधील काही साडी व्यापारी एकवटले आहेत. या अभियानाअंतर्गत महिलांना साडी खरेदी केल्यावर कोरोनाशी लढण्यासाठी मदत करणाऱ्या वस्तू देण्यात येत आहेत. सा़डी खरेदी केल्यास आता त्यासोबत एक 'कोरोना कवच' नावाचा बॉक्स व्यापाऱ्यांकडून देण्यात येईल. साडीवर मॅचिंग मास्क, सॅनिटायझर, आयुर्वेदिक काढ्याची पावडर आणि होमिओपथी औषध असणार आहे. 

महिलांसाठी खास असलेलं हे कोरोना कवच कोरोनाच्या संकटात उपयोगी ठरणार आहे. साड्यांच्या विक्रीसोबतच लोकांमध्ये कोरोनाबाबत जागृती करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. साडीबरोबर जे कोरोना कवच दिले जात आहे त्यासाठी वेगळे पैसे आकारले जाणार नाहीत. साडीचे पैसे दिल्यानंतर हे कोरोना कवच मोफत मिळत आहे. या साड्यांच्या किंमती 500 रुपयांपासून 5000 रुपयांपर्यंत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक उपाययोजना सुरू आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. भारतात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या साडे तीन लाखांहून अधिक झाली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे  तब्बल 12000 नवे रुग्ण आढळले आहेत. तर देशात कोरोनामुळे आतापर्यंत 12237 लोकांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान अनेक घटना समोर येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : 'त्याच्या' जिद्दीला सलाम! आईचं औषध अन् भावंडांच्या शिक्षणासाठी उचलतोय कोरोनाग्रस्तांचे मृतदेह

Today's Fuel Price : इंधन दरवाढीचा भडका! सलग बाराव्या दिवशी पेट्रोल-डिझेल महागले

CoronaVirus News : बापरे! 'या' व्यक्तींसाठी कोरोना ठरतोय जीवघेणा; 12 पट अधिक आहे मृत्यूचा धोका

CoronaVirus News : तंत्रज्ञानाची किमया! रुग्णाजवळ न जाताच 'हे' भन्नाट उपकरण कोरोना योद्ध्यांना माहिती देणार

एकीकडे चीन तर दुसरीकडे कोरोना; मोदी सरकारसमोर आहेत 'ही' 5 मोठी आव्हानं

 

Web Title: CoronaVirus Marathi News saree industry offering free corona kavach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.