शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : रिक्षातून केला तब्बल 1500 किमीचा प्रवास पण घरजवळ येताच...; मन सुन्न करणारी गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 11:44 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: आपल्या गावी जाण्यासाठी एका कुटुंबाने रिक्षाने आपला प्रवास सुरू केला. तब्बल तीन दिवस मुंबई ते युपी असं 1500 किमीचा प्रवास केला. मात्र घरापासून काही अंतरावर असतानाच मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - कोरोनाच्या जगव्यापी साथीने प्रगत देशांना हतबल केले आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही आव्हाने वाढत आहेत. एक-दुसऱ्यापासून दूर राहणे, घराबाहेर न पडणे, घरातच राहणे, हा एकमेव मार्ग आहे. यात जराही निष्काळजीपणा केल्यास भारताला जबर किंमत मोजावी लागेल. त्याचा अंदाज बांधणेही कठीण आहे, असं कळकळीने सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली. लॉकडाऊनमुळे अनेकांनी काहीच काम नसल्याने त्यांनी आपल्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. विविध पर्याय वापरून ते आपलं गाव गाठत आहेत. याच दरम्यान एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे.

आपल्या गावी जाण्यासाठी एका कुटुंबाने रिक्षाने आपला प्रवास सुरू केला. तब्बल तीन दिवस मुंबई ते युपी असं 1500 किमीचा प्रवास केला. मात्र घरापासून काही अंतरावर असतानाच मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. लॉकडाऊनमुळे घराकडे परतणाऱ्या मजुराच्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. 35 वर्षीय राजन यादव हे आपल्या पत्नी आणि मुलांसह सहा महिन्यांपूर्वीच खरेदी केलेल्या रिक्षाने मुंबईहून उत्तर प्रदेश येथील आपल्या गावी चालले होते. यासाठी त्यांनी तब्बल 1500 किमीचा प्रवास पूर्ण केला. मात्र घरापासून अवघ्या 200 किमी अंतरावर असताना त्यांच्या रिक्षाचा अपघात झाला.

एका ट्रकने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात राजन यांच्या पत्नी आणि सहा वर्षांच्या मुलीचा ट्रकच्या चाकाखाली येऊन जागीच मृत्यू झाला. राजन यादव मुंबईहून रिक्षातून आपल्या कुटुंबाला घेऊन उत्तर प्रदेशकडे निघाले होते. त्यांची पत्नी आणि दोन मुलं तसेच एक पुतण्या असे सर्व रिक्षातून प्रवास करत होते. तसेच त्यांच्यासोबत बाईकवरून त्यांचे आणखी दोन नातेवाईक प्रवास करत होते. मात्र घरापासून अवघ्या 200 किमी अंतरावर झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला. तर सुदैवाने रिक्षात बसलेले इतर जण बचावले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

CoronaVirus News : त्यांचा तो प्रवास ठरला अखेरचा! लॉकडाऊनमध्ये भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू, 11 जखमीलॉकडाऊन दरम्यान काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशच्या नरसिंहपूर येथील पाठा गावाजवळ आंब्याचा ट्रक उलटून अपघात झाला होता. या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 11 जण जखमी झाले. आंब्याचा ट्रकमधून काही जण लपून आपल्या घरी जात होते. याच दरम्यान भीषण अपघात झाला होता. तर त्याआधी कोरोना व्हायरसमुळे काही काम नसल्याने आपल्या गावी जाणाऱ्या मजुरांच्या वाहनाचा तेलंगणातील शमशाबादमध्ये भीषण अपघात झाला होता. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे मजुरांना काम नाही. मिनी ट्रकमधून जवळपास 30 मजूर काम नसल्याने आपल्या गावी परतत होते. यावेळी ट्रकचा भीषण अपघात झाला आणि यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला होता.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : "हजारो मुलं-मुली रस्त्यावर... आज भारत माता रडतेय"

CoronaVirus News : मंत्री शिंकले, सगळेच घाबरले अन् पुढे झालं असं काही...

CoronaVirus News : ... म्हणून 50 हजार गर्भवतींची होणार कोरोना टेस्ट; 'या' राज्याने घेतला निर्णय 

CoronaVirus News : कोरोनाचा धसका! 'या' शहरात 'कॅश ऑन डिलिव्हरी'वर बंदी

CoronaVirus News : कर्तव्यनिष्ठेला सलाम! 9 महिन्यांची गर्भवती नर्स करतेय कोरोनाग्रस्तांची सेवा, पंतप्रधानांनी केलं कौतुक

CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात 'ही' सवय फायदेशीर ठरेल; 50 टक्के संसर्गाचा धोका टळेल

CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात रेशन कार्डाच्या नियमामध्ये बदल; कोट्यवधी लोकांना होणार फायदा

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याauto rickshawऑटो रिक्षाAccidentअपघातDeathमृत्यूMumbaiमुंबईUttar Pradeshउत्तर प्रदेश