शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
3
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
4
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
5
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
6
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
7
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
9
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
10
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
11
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
12
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
13
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
14
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
15
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
16
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
17
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
18
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
20
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा

CoronaVirus News : 'खजिन्याची पेटी उघडा, गरजुंना मदत करा'; सोनिया गांधींचं मोदी सरकारवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 14:54 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सुरू असलेल्या लॉकडाऊनवरून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्ली - भारतातही कोरोनाग्रस्तांचा आकडा सातत्याने वाढत आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात कोरोनाचा धोका वाढत असून देशातील कोरोना रुग्णांची संख्या दीड लाखांवर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 4000 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सुरू असलेल्या लॉकडाऊनवरून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत हल्लाबोल केला आहे.

स्थलांतरित मजुरांच्या मुद्दावरुन सोनिया गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. खजिन्याची पेटी उघडा व गरजुंना तात्काळ मदत करा. काही कुटुंबांना दर महिन्याला 7500 रुपये रोख रक्कमेच्या स्वरुपात द्या असं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. तसेच स्थलांतरित मजुरांचा विषय हाताळण्यामध्ये सरकार कमी पडले असून  मजुरांच्या विषयाकडे मोदी सरकार गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. देशव्यापी लॉकडाऊनमुळे मजुरांचे प्रचंड हाल झाले, त्यांना त्रास सहन करावा लागला, त्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने पुरेशी पावले उचलली नाहीत असं सोनिया यांनी म्हटलं आहे.

'गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देश अन्न आणि रोजगाराच्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच लाखो मजूर उपाशीपोटी, कुठल्याही औषधांशिवाय शेकडो किलोमीटरची पायपीट करुन घरी परतत आहेत. कोटयवधी लोक बेरोजगार झालेत, कारखाने बंद झाले आहेत. पण कदाचित सरकारला याची कल्पना नसावी. केंद्राला विनंती आहे, तुम्ही खजिन्याची पेटी उघडा व गरजुंना तात्काळ मदत करा. काही कुटुंबांना दर महिन्याला 7500 रुपये रोख रक्कमेच्या स्वरुपात द्या आणि त्यात 10 हजार रुपये तात्काळ द्या' असं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.

'सरकारकडे लॉकडाऊनसंदर्भात कुठल्याही प्रकारचा प्लॅन नव्हता. सरकारकडे कोरोना संकटातून बाहेर पडण्यासाठी कुठल्याही प्रकारचे नियोजन नव्हते. सातत्याने लॉकडाऊन केल्याचा काहीही फायदा झाला नाही, परिणाम खराबच आले. कोरोना टेस्ट आणि पीपीई किटसाठीही हे सरकार फेल ठरले. अर्थव्यवस्था कोलमडली. लॉकडाऊनच्या नावावर क्रूर थट्टा झाली. पीएमओकडे सर्वप्रकारची ताकद आहे. त्याचा वापर कर्मचारी आणि कंपन्यांच्या सुरक्षिततेसाठी केला जावा' असं काही दिवसांपूर्वी सोनिया गांधी यांनी म्हटलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : कोरोनाग्रस्तांचा आकडा 57 लाखांवर; 'या' देशात एकही मृत्यू नाही तर काही ठिकाणी गंभीर स्थिती

संतापजनक! हा कसला बाप?... 2 महिन्यांच्या बाळाला 22 हजारांना विकलं; कारण वाचून बसेल धक्का

CoronaVirus News : ...म्हणून चिमुकल्यांना मास्क घालू नका; आरोग्य तज्ज्ञांनी दिला पालकांना सल्ला

CoronaVirus News : भयंकर! 'तो' आयसोलेशन वॉर्डमधून पळाला, गावभर फिरला; कोरोना पॉझिटिव्ह आला...

CoronaVirus News : बापरे! 6 फुटापर्यंतच्या सोशल डिस्टन्सिंगमध्येही कोरोनाचा धोका; इतकं ठेवा अंतर

CoronaVirus News : प्रेमासाठी काय पण! लॉकडाऊनमध्ये गर्लफ्रेंडसाठी 'तो' झाला 'ती' अन् घडलं असं काही...

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी