शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारची शेतकऱ्यांना भेट; 'पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने'साठी २४ हजार कोटींची तरतूद
2
मोठी बातमी! आनंदराज आंबेडकरांची एकनाथ शिंदेंना साथ; शिंदेसेना-रिपब्लिकन सेनेच्या युतीची घोषणा
3
MTNL Defaults: कर्जात बुडालीये 'ही' सरकारी कंपनी; बँकांना परत करू शकत नाहीये ८५८५ कोटींचं लोन, जाणून घ्या
4
बाबर क्रूर, अकबर सहिष्णू तर औरंगजेब मंदिर पाडणारा', NCERT ने पुस्तकात केले मोठे बदल
5
१६०० कोटी पगार! मेटा 'या' व्यक्तींसाठी उधळतोय पाण्यासारखा पैसा, कारण ऐकून धक्का बसेल!
6
तिकीट काढले विमानाचे, प्रवास घडला कारचा; Air India च्या प्रवाशांसोबत नेमके काय घडले?
7
भारताकडून ब्राह्मोस, जपानकडून युद्धनौका, आता तैवानसोबत मिळून चीनला आव्हान देणार हा देश
8
लँडिंगसाठी जागाच मिळेना, एकाच वेळी १७३ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; इंडिगोच्या पायलटने 'अशी' दाखवली हुशारी!
9
गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने कसे कमावले पैसे, भारतात स्थायिक होण्याचे कारणही सांगितले
10
मुलाच्या हव्यासापोटी जन्मदाता बापच झाला हैवान; ७ वर्षांच्या लेकीला कालव्यात फेकून मारलं
11
श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती दररोज करता का? शुभ-लाभ होतात, स्वामी कायम सोबत राहतात!
12
Chaturmas 2025: चातुर्मासात गुरुवारपासून सुरू करा दत्तबावनी, फक्त पाळा 'हे' नियम!
13
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळ पहिल्या क्रमांकावर राज्य करणारे गोलंदाज!
14
एकटे PM मोदीच आठवड्याला १०० तास काम करतात; '७० तास'वरून ट्रोल झालेल्या नारायण मूर्तींचं प्रशस्तीपत्रक
15
गुवाहाटीची रहीमा सोनमपेक्षाही भयंकर! पतीला संपवलं अन् बेडरूमध्येच गाडलं, शांततेत झोपली; कशी पकडली गेली?
16
सूर्य गोचराने शुभ राजयोग: ७ राशींचे कल्याण, भाग्याची साथ; महिनाभर ‘हे’ करा, लाभच लाभ मिळवा!
17
चला हवा येऊ द्या! CHYD चं नवं शीर्षक गीत रिलीज; कॉमेडीच्या गँगवॉरची झलक बघा
18
मस्क अजूनही नंबर १, पण झुकरबर्गला बसला मोठा धक्का! AI च्या कामगिरीने 'हा' उद्योगपती झाला जगात दुसरा श्रीमंत!
19
IND vs ENG: शुभमन गिलने कोहलीसारखा ब्रँड बनण्याचा प्रयत्न करू नये, माजी क्रिकेटपटूचा महत्त्वाचा सल्ला!

CoronaVirus News : ...म्हणून मजुरांना आपल्या राज्यापेक्षा केरळ वाटतंय जास्त सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 15:09 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: लॉकडाऊनमुळे अनेकांना काहीच काम नसल्याने त्यांनी आपल्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकांनी पायी जाण्याचा पर्याय निवडला आहे. मात्र याच दरम्यान केरळने स्थलांतरीत मजुरांचं मन जिंकल्याची माहिती समोर आली आहे. 

गुवाहाटी - जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही एक लाखांच्या वर पोहोचली आहे. तर 3000 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात लॉकडाऊनसोबत तपासणीला गती दिली जात असताना संसर्गित रुग्णांची संख्या वाढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मात्र लॉकडाऊनमुळे अनेकांना काहीच काम नसल्याने त्यांनी आपल्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकांनी पायी जाण्याचा पर्याय निवडला आहे. मात्र याच दरम्यान केरळने स्थलांतरीत मजुरांचं मन जिंकल्याची माहिती समोर आली आहे. 

केरळमध्येआसाममधून स्थलांतरीत झालेले अनेक मजूर हे काम करतात. सध्या इतर ठिकाणी असलेल्या मजुरांना आपल्या घराकडे जाण्याची ओढ लागली आहे. मात्र या उलट परिस्थिती ही केरळमध्ये पाहायला मिळत आहे. आसामच्या मजुरांना आपल्या घराकडे जाण्याची फारशी घाई नाही. कारण या परिस्थितीत ते आपल्या कामाच्या ठिकाणी अर्थात केरळमध्येच राहण्याला अधिक पसंती देत आहेत. मंगळवारपर्यंत आसाममध्ये वेगवेगळ्या राज्यांतून जवळपास 50 हजार स्थलांतरीत मजूर परतले आहेत. मात्र यामध्ये एकही मजूर हा केरळहून आलेला नाही. 

मिळालेल्या माहितीनुसार, या पूर्वेत्तर राज्यात जवळपास 40 ते 50 हजार तरुण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात. आसामच्या धेमाजी जिल्ह्याचे रहिवासी असलेले दंबेस्वर बरुआ हे गेल्या 26 वर्षांपूर्वी कामाच्या शोधात ते केरळमध्ये आले. काही लोक सोडले तर अधिकतर स्थलांतरीत मजूर हे सध्या केरळमध्ये सुरक्षित आहेत. त्यांना सगळ्या सेवा-सुविधा मिळत आहेत. त्यामुळेच त्यांना आसामला परतण्याची इच्छा नाही अशी माहिती दंबेस्वर यांनी दिली आहे. 

केरळच्या पोलीस महासंचालकांनी मजुरांना आपला खासगी मोबाईल क्रमांक दिला आहे. त्यामुळे संकटकाळात ते तत्काळ पोलिसांची मदत घेऊ शकतात. आसामचे रहिवासी असलेल्या मंटू दत्ता यांनीही केरळच्या प्रशासनाचं कौतुक केलं आहे. मंटू हे एर्नाकुलम जिल्ह्यातील एका बर्फाच्या कारखान्यात फ्रिजिंग ऑपरेटर म्हणून काम करतात. 'स्थलांतरीत मजुरांच्या मदतीसाठी पंचायत सदस्यही धावून आले. ते सतत आमच्या संपर्कात आहेत. माझ्या मालकाकडून मला बेसिक पगार मिळत आहे. कारखाना सुरू झाल्यावर आम्हाला आमचा पूर्ण पगारही मिळणं सुरू होईल' असं मंटू यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : धोका वाढला! 4 दिवसांत 400 नवे रुग्ण; 'या' राज्यात येणारी चौथी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

बाप रे बाप! 8 दिवसांत घरातून निघाली सापाची तब्बल 123 पिल्ले; लोकांचा उडाला थरकाप

कौतुकास्पद! डॉ. हर्षवर्धन यांचा देशाला अभिमान; जागतिक आरोग्य संघटनेत मिळालं मानाचं स्थान

CoronaVirus News : सरकारच्या 'या' योजनेचा 1 कोटी गरिबांना मिळाला आधार; मोदी म्हणाले...

CoronaVirus News : काय सांगता? संगीत ऐकून कोरोनाग्रस्त बरे होणार; 'ही' थेरेपी फायदेशीर ठरणार

CoronaVirus News : बापरे! मास्क न लावल्यास अटक होणार; 'या' देशाने घेतला मोठा निर्णय

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKeralaकेरळAssamआसामIndiaभारतDeathमृत्यूPoliceपोलिस