शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
3
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
4
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
5
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
6
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
7
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
8
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
9
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
10
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
11
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
12
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
13
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
14
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
15
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
16
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
17
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
18
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
19
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
20
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक

CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये लपून-छपून भेटणं पडलं महागात, 'त्या' दोघांना गावकऱ्यांनी पाहिलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2020 12:33 PM

CoronaVirus Marathi News and Live Updates: लॉकडाऊनमध्ये लपून छपून भेटणं एका जोडप्याला चांगलंच महागात पडलं आहे. लॉकडाऊनमुळे लोकांना घरातून बाहेर पडण्यास बंदी आहे. तरीही गावातील एक तरुण आणि तरुणी भेटत होते.

पाटणा - भारतात सध्याची स्थिती पाहता 17 मेपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 37,000 च्या वर गेला आहे. तर आतापर्यंत 1100 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधानांनी लोकांना घरी राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच सोशल डिस्टंसिंग पाळण्यास सांगितलं आहे. मात्र तरीही अनेक ठिकाणी गर्दीचे चित्र पाहायला मिळत आहे. लोक विनाकारण लॉकडाऊनमध्येही घराबाहेर पडत आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. 

लॉकडाऊनमध्ये लपून छपून भेटणं एका जोडप्याला चांगलंच महागात पडलं आहे. लॉकडाऊनमुळे लोकांना घरातून बाहेर पडण्यास बंदी आहे. तरीही गावातील एक तरुण आणि तरुणी भेटत होते. गावकऱ्यांना ही गोष्ट समजली. त्यांनी या दोघांना भेटताना पाहिलं आणि थेट त्यांचं एका मंदिरात लग्न लावून दिलं. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत त्यांचं लग्न लावून दिलं. मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील बेगुसराय येथे ही घटना घडली आहे. कोठीयारा गावातील ललित कुमार याचे गावातीलच राणी नावाच्या तरुणीवर प्रेम होते. गेल्या एक वर्षांपासून त्यांचं प्रेमप्रकरण सुरू होतं. मात्र लॉकडाऊन दरम्यान देखील हे दोघं भेटत असल्याची माहिती गावकऱ्यांना कळली. 

 

गावकऱ्यांनी एकदा या दोघांना गावामध्येच भेटताना पकडलं. त्यानंतर गावातील प्रमुखांनी पंचायत बोलावून दोघांच्या घरच्यांना लग्नासाठी तयार केलं. गावातील एका शिव मंदिरात ललित आणि राणी यांचे लग्न झाले. यावेळी गावकरी उपस्थित होते. तसेच लग्नात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले होते. दोघेही मास्क लावून बोहल्यावर चढले. दोघांनाही भेटताना गावकऱ्यांनी पाहिलं होतं. त्यानंतर दोघांचे लग्न लावून देण्यात आल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

देशातील लॉकडाऊनचा दुसरा टप्पा आज पूर्ण होत असून तिसऱ्या टप्प्याला उद्यापासून सुरुवात होत आहे. लॉकडाऊनच्या काळात देशातील लोकसंख्येत कसा परिणाम झाला हेही महत्वाचे आहे. यांसंदर्भात सेंटर ऑफ पॉलिसी रिसर्च यांचा एक अहवाल समोर येत आहे. त्यानुसार, शहरातील लोकसंख्या 11 टक्क्यांनी कमी झाली असून गावातील लोकसंख्या 7 टक्क्यांनी वाढली आहे. लॉकाडाऊनमुळे सध्या शहरात कुणीही येत नाही. सीपीआरचे वरिष्ठ विद्यार्थी आणि स्टी के चे सहायक लेखल पार्थ मुखोपाध्याय यांनी सांगितले की, लॉकडाऊनमुळे लाखों लोक आता शहरांकडे येत नाहीत. त्यामुळेच, शहरांजवळी ग्रामीण भागातील लोकसंख्या वाढली आहे. पश्चिमी राजस्थान, ओडिशाजवळ हे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News: कोरोना योद्ध्यांना सलाम; रुग्णालयांवर हवाई दलाकडून पुष्पवर्षाव

गड्या आपला गावच बरा... लॉकडाऊनमुळे गावातील लोकसंख्येत ७ टक्क्यांनी वाढ

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBiharबिहारmarriageलग्न