CoronaVirus News : देशात एका दिवसात कोरोनाचे तब्बल 9887 नवे रुग्ण, 294 जणांचा मृत्यू; चिंताजनक आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 11:13 AM2020-06-06T11:13:13+5:302020-06-06T11:20:02+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशात धोका वाढला असून कोरोनाच्या आकडेवारीने आतापर्यंतचा नव्या रुग्णांच्या संख्येचा रेकॉर्ड मोडला आहे. 

CoronaVirus Marathi News highest spike COVID19 cases 9887 deaths 294 India | CoronaVirus News : देशात एका दिवसात कोरोनाचे तब्बल 9887 नवे रुग्ण, 294 जणांचा मृत्यू; चिंताजनक आकडेवारी

CoronaVirus News : देशात एका दिवसात कोरोनाचे तब्बल 9887 नवे रुग्ण, 294 जणांचा मृत्यू; चिंताजनक आकडेवारी

googlenewsNext

नवी दिल्ली - जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. जगातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 68 लाखांच्या वर गेली आहे. जवळपास तीन लाख 80 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र याच दरम्यान चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. देशात धोका वाढला असून कोरोनाच्या आकडेवारीने आतापर्यंतचा नव्या रुग्णांच्या संख्येचा रेकॉर्ड मोडला आहे. 

गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 9887 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 294 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 236657 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 6642 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. शनिवारी (6 जून) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 9887 नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दोन लाख 30 हजारांवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा सहा हजारांवर पोहोचला आहे. 

भारतातील कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 115942 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 114073  रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोना व्हायरसच्या फैलावामुळे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची सध्या बिकट अवस्था झाली आहे. सुमारे सव्वा दोन महिने चाललेल्या लॉकडाऊननंतरही मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या घटलेली नाही. मात्र आता देशाच्या आर्थिक राजधानीपेक्षा राजकीय राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये कोरोनाचा प्रकोप वाढू लागला आहे.

कोरोना संदर्भातील अफवाही वेगाने पसरत आहेत. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये कोरोना हा व्हायरस नाही तर बॅक्टेरिया आहे असं सांगण्यात आलं होतं. तसेच  बॅक्टेरिया असल्याने Aspirin ने त्यावर उपचार करता येऊ शकतात असं देखील व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. मात्र आता पीआयबी फॅक्ट टीमने हा दावा खोटा ठरवा आहे. ही अफवा पसरवली जात असल्याचं स्पष्ट केलं आहे. 


 

महत्त्वाच्या बातम्या

बापरे! देशात जुलैमध्ये पुन्हा टोळधाड धडकणार, 'या' राज्यांना केलं अलर्ट

CoronaVirus News : खरंच की काय? लॉकडाऊनमध्ये वाया गेलेली वाईन वाचवणार आता लोकांचा जीव; पण कसा...

CoronaVirus News : कोरोना हा व्हायरस नाही तर बॅक्टेरिया?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य

CoronaVirus News : सर्वसामान्यांसाठी खूशखबर! 'या' जीवनावश्यक वस्तू झाल्या स्वस्त

CoronaVirus News : शाळा सुरू करणं 'या' देशाला पडलं महागात; तब्बल 261 जणांना कोरोनाची लागण

CoronaVirus News : लॉकडाऊनचा फटका! ...म्हणून सिंगापूरमध्ये शेफ असलेल्या तरुणाला चाराव्या लागताहेत बकऱ्या

CoronaVirus News : लवकर रेस्टॉरंट सुरू होणार, 'या' गोष्टी बदलणार; जाणून घ्या नेमकं कसं असणार?


 

Web Title: CoronaVirus Marathi News highest spike COVID19 cases 9887 deaths 294 India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.