CoronaVirus News : कोरोनाचा हाहाकार! गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ, चिंता वाढवणारी आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 10:28 AM2020-07-19T10:28:15+5:302020-07-19T10:32:17+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर आली आहे.

CoronaVirus Marathi News Highest single day spike 38,902 cases India 24 hours | CoronaVirus News : कोरोनाचा हाहाकार! गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ, चिंता वाढवणारी आकडेवारी

CoronaVirus News : कोरोनाचा हाहाकार! गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ, चिंता वाढवणारी आकडेवारी

Next

नवी दिल्ली - कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही एक कोटीच्यावर गेली आहे. तर दुसरीकडे देशामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर आली आहे. 

देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. धोका वाढला असून गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 38,902 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 543 जणांचा मृत्यू झाला आहे.  भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 10,77,618 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 26,816 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (19 जुलै) देशात गेल्या 24 तासांत 38,902 नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल दहा लाखांच्या वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 26,816 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 3,73,379 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 6,77,423 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

लहान मुलांनाही कोरोनाची लागण झाली आहे. विविध ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दिल्लीतील काही रुग्णालयात कोरोनाची लागण झालेल्या चिमुकल्यांमध्ये कावासाकी या नावाच्या गंभीर आजाराची लक्षणं आढळून आली आहेत. हा आजार पाच वर्षांखालील मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळत आहे. तसेच यामध्ये मुलांना तापही येतो अशी माहिती मिळत आहे. यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

'मोदी सरकारच्या भ्याडपणाची मोठी किंमत देशाला मोजावी लागेल'; राहुल गांधींचा हल्लाबोल

"कोरोनापासून बचावासाठी गोमूत्र प्या", भाजपा नेत्याचा अजब सल्ला

CoronaVirus News : चिंता वाढली! कोरोनाग्रस्त चिमुकल्यांमध्ये दिसताहेत 'या' गंभीर आजाराची लक्षणं

CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात आशेचा किरण! ऑक्सफर्डला मिळालं आणखी एक मोठं यश

कोरोनाचा धसका! आपलेही झाले परके... पतीचा मृतदेह हातगाडीवरुन नेऊन पत्नीने केले अंत्यसंस्कार

CoronaVirus News : कोरोनाचा विस्फोट! 100 तासांत तब्बल 10 लाख नवे रुग्ण, धडकी भरवणारी आकडेवारी

Web Title: CoronaVirus Marathi News Highest single day spike 38,902 cases India 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.