'मोदी सरकारच्या भ्याडपणाची मोठी किंमत देशाला मोजावी लागेल'; राहुल गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 09:08 AM2020-07-19T09:08:47+5:302020-07-19T09:24:55+5:30

भारत आणि चीनमध्ये असलेल्या तणावाच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहे.

india china border dispute india will pay governments cowardice say rahul gandhi | 'मोदी सरकारच्या भ्याडपणाची मोठी किंमत देशाला मोजावी लागेल'; राहुल गांधींचा हल्लाबोल

'मोदी सरकारच्या भ्याडपणाची मोठी किंमत देशाला मोजावी लागेल'; राहुल गांधींचा हल्लाबोल

Next

नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधीभारत आणि चीनमध्ये असलेल्या तणावाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आक्रमक झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. 'मोदी सरकारच्या भ्याडपणाची मोठी किंमत देशाला मोजावी लागेल' असं म्हणत राहुल गांधींनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबतचे ट्विट केले आहे. 

"चीननेभारताच्या जमिनीवर कब्जा मिळवलाय आणि भारत सरकार 'चेम्बरलेन'सारखं वागत आहे. यामुळे चीन आणखी पुढे जाईल. भारताला मात्र मोदी सरकारच्या भ्याडपणाची मोठी किंमत मोजावी लागेल" असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. तसेच या ट्विटसोबत राहुल यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. हा व्हिडिओ राजनाथ सिंह यांच्या लेह दौऱ्याचा आहे. 'भारत चीन दरम्यान चर्चेतून तोडगा काढणं कितपत शक्य आहे हे सांगता येणं कठीण आहे' असं राजनाथ सिंह यांनी या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. 

जगातील कोणतीही ताकद भारताची एक इंच जमिनही घेऊ शकत नाही, असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं. लडाखच्या लुकूंग भागात एका फॉरवर्ड पोस्टवर लष्कर तसेच भारत तिबेट सीमा पोलीस जवानांना संबोधित करतानाचा त्यांचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत राहुल गांधी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. राहुल यांनी चीनच्या घुसखोरीसंदर्भात याआधीही एक व्हिडीओ शेअर केला होता, त्या माध्यमातून त्यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली होती.

देशाची अर्थव्यवस्था, शेजारील राष्ट्रांशी संबंध आणि परराष्ट्र धोरणाबाबत राहुल गांधी यांनी स्पष्ट भूमिका मांडली. चीनने घुसखोरी करण्यासाठी नेमकी हीच वेळ का निवडली, असा सवाल उपस्थित केला होता. अशी वेळ का आली आहे, ज्यामुळे आपण भारताविरोधात पाऊल उचलू शकतो, असा चीनच्या मनात विश्वास निर्माण झाला आहे. ही बाब समजून घेण्यासाठी आपल्याला काही गोष्टींचा अभ्यास करावा लागेल. देशाचे संरक्षण हे मुख्यत्वेकरून परराष्ट्र धोरण, अर्थव्यवस्था आणि जनतेच्या विश्वासावर अवलंबून असते. मात्र गेल्या सहा वर्षांत आपला देश या सर्व बाबतीत अपयशी ठरला आहे असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

"कोरोनापासून बचावासाठी गोमूत्र प्या", भाजपा नेत्याचा अजब सल्ला

CoronaVirus News : चिंता वाढली! कोरोनाग्रस्त चिमुकल्यांमध्ये दिसताहेत 'या' गंभीर आजाराची लक्षणं

CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात आशेचा किरण! ऑक्सफर्डला मिळालं आणखी एक मोठं यश

काय सांगता? Google लवकरच फूड डिलिव्हरी क्षेत्रात एंट्री करणार, 'या' लोकप्रिय कंपन्यांना टक्कर देणार 

कोरोनाचा धसका! आपलेही झाले परके... पतीचा मृतदेह हातगाडीवरुन नेऊन पत्नीने केले अंत्यसंस्कार

CoronaVirus News : कोरोनाचा विस्फोट! 100 तासांत तब्बल 10 लाख नवे रुग्ण, धडकी भरवणारी आकडेवारी

Web Title: india china border dispute india will pay governments cowardice say rahul gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.