शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
3
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
4
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
5
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
6
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
7
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
8
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
9
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
10
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
11
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
12
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
13
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
14
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
15
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
16
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
17
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
18
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
19
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
20
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?

CoronaVirus News : भयंकर! 'तो' आयसोलेशन वॉर्डमधून पळाला, गावभर फिरला; कोरोना पॉझिटिव्ह आला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 09:37 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील विविध रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेच्यादृष्टीन विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. मात्र याच दरम्यान प्रशासनाचा एक निष्काळजीपणा समोर आला आहे.

हाजीपूर - कोरोना व्हायरसच्या जगव्यापी साथीने प्रगत देशांना हतबल केले आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही आव्हाने वाढत आहेत. एक-दुसऱ्यापासून दूर राहणे, घराबाहेर न पडणे, घरातच राहणे, हा एकमेव मार्ग आहे. यात जराही निष्काळजीपणा केल्यास भारताला जबर किंमत मोजावी लागेल. त्याचा अंदाज बांधणेही कठीण आहे, असं कळकळीने सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली. मोदींनी लोकांना जेथे आहात तेथेच राहण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व खबरदारीचे उपाय केले जात आहेत. अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

देशातील विविध रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेच्यादृष्टीन विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. मात्र याच दरम्यान प्रशासनाचा एक निष्काळजीपणा समोर आला आहे. आयसोलेशन वॉर्डमधून एका कोरोना रुग्णाने पळ काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पंजाबच्या हाजीपूरमधील लालगंजमध्ये हा भयंकर प्रकार घडला आहे. क्वारंटाईन सेंटर एबीएस कॉलेजमध्ये राहणाऱ्या प्रवासी मजुराचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता.

लालगंज परिसरात एकूण 9 मजुरांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी आठ मजूर हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं. त्यामुळे त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने हाजीपुरातील आयसोलेशन वॉर्डमध्ये पाठविण्याचे सांगण्यात आले. मात्र त्यापैकी एक प्रवासी मजूर आयसोलेशन वॉर्डातून पळाला. इतकंच नाही तर तो पळाल्यानंतर आपल्या घरी गेला. त्यानंतर बँकेतून पैसे काढण्यासाठी गेला आणि केस कापण्यासाठी सलूनमध्येही गेला. पुढे 2 दिवस तो गावभर फिरत होता. धक्कादायक बाब म्हणजे प्रशासनाला याबाबत काहीच माहिती नव्हती. 

मजुरांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट आल्यावर प्रशासनाला जाग आली आणि आयसोलेशन वॉर्डमध्ये एक मजूर नसल्याचं समजलं. आयोसेलेशन वॉर्डमधून बेपत्ता झालेल्या मजुराला शोधण्यासाठी धावाधाव सुरू झाली. विशेष म्हणजे आयसोलेशन वॉर्डमधून एक मजूर बेपत्ता झाला होता व प्रशासनाला याबाबत माहितीच नव्हती. मजुराच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्यात आला असून त्यांची देखील कोरोना चाचणी करण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.