शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

CoronaVirus News : कोरोना वॉरियर महिला अधिकाऱ्याचा मृत्यू; कर्तव्यनिष्ठेला मुख्यमंत्र्यांनी केला सलाम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 2:29 PM

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना व्हायरसपासून लोकांचा बचाव करता यावा यासाठी सर्वच क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहे.

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक उपाययोजना सुरू आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. भारतात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. रुग्णांचा आकडा 9,06,752 वर पोहोचला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 23,727 लोकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोना व्हायरसपासून लोकांचा बचाव करता यावा यासाठी सर्वच क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहे. याच दरम्यान एक धक्कादाक घटना समोर आली आहे. 

पश्चिम बंगालमध्ये कोरोनाच्या संकटात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या एका महिला अधिकाऱ्याचा कोरोनाचा संसर्ग झाल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. देवदत्ता रे असं या महिला अधिकाऱ्याचं नाव आहे. पश्चिम बंगालच्या हुगली जिल्ह्यातील चंदननगर उपविभागात उपदंडाधिकारी म्हणून त्या कार्यरत होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, ड्यूटीदरम्यान देवदत्ता यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची काही लक्षणं दिसू लागल्यावर त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आलं.

देवदत्ता यांची तब्येत आणखी बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र दुसऱ्या दिवशी त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देवदत्ता रे यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ममता बॅनर्जी यांनी देवदत्ता यांच्या कर्तव्यनिष्ठेला सलाम केला आहे. ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. देवदत्ता रे यांच्यावर ट्रेनमधून बंगालमध्ये परतणाऱ्या परप्रांतीय मजुरांची जबाबदारी होती. 

देवदत्ता यांनी माणुसकी आणि संवेदनशीलता दाखवत ज्या पद्धतीने त्यांनी परिस्थिती हाताळली त्याचं सर्वत्र कौतुक केलं जात होतं. त्यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 28,498 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 553 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 63.02% झाले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

CBSE Results 2020 : मोठी बातमी! CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर 

चीनने 59 अ‍ॅप्सच्या बंदीवर पुन्हा एकदा विचारला प्रश्न, भारताने दिलं 'हे' सडेतोड उत्तर

बंगल्यात आणखी काही दिवस राहू द्या, प्रियंका गांधींनी केली मोदींना विनंती?, जाणून घ्या सत्य

CoronaVirus News : सलाम! ...अन् डॉक्टरने स्वत: ट्रॅक्टर चालवून अंत्यसंस्कारासाठी नेला कोरोनाग्रस्ताचा मृतदेह

Vikas Dubey Encounter : विकास दुबेचा आणखी एक प्लॅन आला समोर, रिक्षाचालकाने केला खुलासा

Google भारतात 75 हजार कोटींची गुंतवणूक करणार, सुंदर पिचाईंची मोठी घोषणा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwest bengalपश्चिम बंगालDeathमृत्यूIndiaभारतMamata Banerjeeममता बॅनर्जी