चीनने 59 अ‍ॅप्सच्या बंदीवर पुन्हा एकदा विचारला प्रश्न, भारताने दिलं 'हे' सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 12:16 PM2020-07-14T12:16:21+5:302020-07-14T12:23:07+5:30

लोकप्रिय अ‍ॅप टिकटॉकसह 59 चिनी अ‍ॅप्सवर मोदी सरकारने बंदी घातली आहे. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने कलम 69 A च्या अंतर्गत ही बंदी घातली आहे.

china asked the reason for banning 59 chinese apps this is what india said | चीनने 59 अ‍ॅप्सच्या बंदीवर पुन्हा एकदा विचारला प्रश्न, भारताने दिलं 'हे' सडेतोड उत्तर

चीनने 59 अ‍ॅप्सच्या बंदीवर पुन्हा एकदा विचारला प्रश्न, भारताने दिलं 'हे' सडेतोड उत्तर

googlenewsNext

नवी दिल्ली - केंद्रातील मोदी सरकारने चीनला मोठा दणका दिला आहे. लोकप्रिय अ‍ॅप टिकटॉकसह 59 चिनी अ‍ॅप्सवर मोदी सरकारने बंदी घातली आहे. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने कलम 69 A च्या अंतर्गत ही बंदी घातली आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे सांगत 59 चिनी मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये टिकटॉक, यूसी ब्राऊझर आणि हॅलो अ‍ॅप यासारख्या लोकप्रिय अ‍ॅप्सचा समावेश आहे. सरकारच्या बंदीच्या आदेशानंतर आता अ‍ॅपल आणि गुगलनेही TikTok ला दणका देत मोठा निर्णय घेतला. भारतामध्ये TikTok गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवरुन हटवण्यात आलं आहे.

भारताने चिनी मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी घातल्याने चीनला मोठा फटका बसला आहे. दिल्लीमध्ये झालेल्या एका चर्चेदरम्यान भारताकडून 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा मुद्दा चीनने उपस्थित केला. तसेच चिनी अ‍ॅप्सवर बंदी का घातली असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. चीनच्या या प्रश्नाला भारताने सडेतोड उत्तर दिले आहे. या अ‍ॅप्सवर बंदी आणण्यासाठी भारताकडून सुरक्षेची कारणे देण्यात आली आहेत. भारत सरकारच्या सूत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला याबाबत माहिती दिली आहे.

भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या चर्चेदरम्यान अ‍ॅप्सच्या बंदीचा मुद्दा चीनच्या बाजूने उपस्थित करण्यात आला होता. त्यावर चीन हे भारतीय नागरिकांच्या खासगी डेटामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही असं भारताने स्पष्ट केलं आहे. तसेच ही अ‍ॅप्स भारताच्या एकात्मतेला आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहचवणारी असून देशाच्या सुरक्षेसाठी आणि सुव्यवस्थेसाठी या अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आल्याचं भारताने पुन्हा एकदा चीनला ठणकावून सांगितले आहे. 

केंद्र सरकारने भारताच्या सुरक्षिततेला धोका ठरू शकणाऱ्या 59 चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी जाहीर केला आहे. बाजारात कोट्यवधींच्या संख्येने विकल्या जाणाऱ्या चिनी कंपन्यांच्या मोबाईल फोनमध्ये यापैकी बरीच लोकप्रिय अ‍ॅप इनबिल्ट पद्धतीने उपलब्ध असल्याने सरकारने या अ‍ॅप्सचा वापर करण्यासही बंदी घातली आहे. या अ‍ॅप्समुळे खासगी डेटा व खासगीपण यांच्यावर आक्रमण होत असल्याच्या तक्रारी आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बंगल्यात आणखी काही दिवस राहू द्या, प्रियंका गांधींनी केली मोदींना विनंती?, जाणून घ्या सत्य

CoronaVirus News : सलाम! ...अन् डॉक्टरने स्वत: ट्रॅक्टर चालवून अंत्यसंस्कारासाठी नेला कोरोनाग्रस्ताचा मृतदेह

Vikas Dubey Encounter : विकास दुबेचा आणखी एक प्लॅन आला समोर, रिक्षाचालकाने केला खुलासा

Google भारतात 75 हजार कोटींची गुंतवणूक करणार, सुंदर पिचाईंची मोठी घोषणा


 

Web Title: china asked the reason for banning 59 chinese apps this is what india said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.