शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
3
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
4
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
5
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
6
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
7
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
8
Gemology: भाग्यरत्न घातल्याने खरोखरंच भाग्य बदलते का? कोणत्या रत्नाचा काय प्रभाव पडतो जाणून घ्या!
9
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
10
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
11
सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद
12
IPL मुळे भारताच्या वाट्याला T20 WC पूर्वी १ सराव सामना; दोन बॅचमध्ये संघ अमेरिकेला जाणार
13
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
14
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
15
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
16
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
17
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
18
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
19
निखळ सौंदर्यानं अभिनेत्रींना देते मात; सरकारी अधिकारी अन् मोफत उपचार करणारी डॉक्टर
20
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!

अमित शहा अत्यवस्थ? खुद्द केंद्रीय गृहमंत्र्यांनीच 'गायब' असण्याचे सांगितले कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2020 4:37 PM

CoronaVirus विविध राज्यांदरम्यान ताळमेळ राखणे या काळात खूप महत्वाचे होते. त्या राज्यांना लागणारी मदत, पुरवठा, लॉकडाऊनचे नियोजन, विविध नियम बनविणे आदींचे काम गृह मंत्रालयातून होत होते. 

ठळक मुद्देआज अमित शहा यांनी माझ्या प्रकृती अस्वास्थ्याच्या अफवा असल्याचे म्हटले आहे. तबलिगी जमात प्रकरणावेळी एनएसए अजित डोवाल यांना मध्यस्थी करण्यासाठी पाठविल्याची एकच घडामोड या काळात शहांच्या नावावर होती.माझ्या पक्षाच्या लाखो कार्यकर्त्यांनी गेल्या दोन दिवसांपासून चिंता व्यक्त केली, त्यांच्यासाठी मला समोर यावे लागले.

नवी दिल्ली : कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यापासून एरव्ही राजकारणात कमालीचे अॅक्टिव्ह असलेले भाजपाचे चाणक्य अमित शहा कुठेच दिसले नव्हते. यामुळे त्यांची प्रकृती गंभीर असल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. विरोधकांनी तर अमित शहा कुठे गायब झाले, असे प्रश्नही विचारायला सुरुवात केली होती. तबलिगी जमात प्रकरणावेळी एनएसए अजित डोवाल यांना मध्यस्थी करण्यासाठी पाठविल्याची एकच घडामोड या काळात शहांच्या नावावर होती. यामुळे शंकेची पाल चुकचुकत होती. 

मात्र, आज अमित शहा यांनी माझ्या प्रकृती अस्वास्थ्याच्या अफवा असल्याचे म्हटले आहे. काही मित्रांनी सोशल मि़डीयावर माझ्या प्रकृतीविषयी अनेक अफवा पसरवल्या. एवढेच नाही तर काहींनी माझ्या मृत्यूसाठीही प्रार्थना केली आहे. देश कोरोना सारख्या जागतिक महामारीविरोधात लढत आहे आणि मी गृह मंत्री म्हणून दिवस रात्र कामात व्यस्त होतो. यामुळे या अफवांकडे लक्ष दिले नव्हते. जेव्हा माझ्या हे लक्षात आले की माझी तब्येत खराब असल्याचा काल्पनिक आनंद या अफवा पसरविणाऱ्यांना होत आहे, तेव्हा मी यावर खुलासा न करण्याचाच निर्णय घेतला. 

मात्र, माझ्या पक्षाच्या लाखो कार्यकर्त्यांनी गेल्या दोन दिवसांपासून चिंता व्यक्त केली, त्यांच्यासाठी मला समोर यावे लागत असल्याचे शहा यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. मी पूर्णपणे ठणठणीत असून मला कोणताही आजार नाहीय. हिंदू धर्माानुसार अशा प्रकारच्या अफवा प्रकृती आणखी ठणठणीत ठेवतात. यामुळे मी अशा सर्व लोकांकडून एकच आशा व्यक्त करतो, की यापुढे तुम्ही मला माझे काम करू द्याल आणि स्वत:ही कराल. तुमच्याप्रती माझ्या मनामध्ये कोणताही द्वेष नसल्याचे शहा यांनी म्हटले आहे. 

अमित शहा काय करत होते ?

2 मे रोजी अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत कोरोनामुळे नुकसान झालेल्या कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच्या बैठकीत सहभाग घेतला होता. 

सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांनी कोरोनाशी लढण्यासाठी पंतप्रधान निधीला मदत निधी दिला. त्याचा चेक ४ मे रोजी अमित शहांना देण्यात आला. 

लॉकडाऊन काळात अमित शहांच्या घरी दुसऱ्या नातीचा जन्म झाला. यासाठी ते गुजरातलाही गेले नव्हते. देशावरील संकटात प्रशासनाच्या बैठका, मंत्रालयातील बैठका आणि नियोजनाचे काम ते रात्री उशिरापर्यंत करत होते. विविध राज्यांदरम्यान ताळमेळ राखणे या काळात खूप महत्वाचे होते. त्या राज्यांना लागणारी मदत, पुरवठा, लॉकडाऊनचे नियोजन, विविध नियम बनविणे आदींचे काम गृह मंत्रालयातून होत होते. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

नादखुळा...! वय वर्ष ५ अन् एसयुव्ही घेऊन खरेदी करायला निघाला लॅम्बॉर्गिनी

छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी व्हेंटिलेटरवर; प्रकृती गंभीर

 

टॅग्स :Amit Shahअमित शहाBJPभाजपाcorona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी