शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये अडकलेले तब्बल 80 हजार लोक 70 विशेष ट्रेनने परतले घरी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2020 2:29 PM

CoronaVirus Marathi News and Live Updates: केंद्रीय गृह मंत्रालयाने 'श्रमिक स्पेशल ट्रेन' सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. मजूर, विद्यार्थी, पर्यटक, तीर्थस्थळांवर अडकलेले यात्रेकरू या विशेष ट्रेनने घरी पोहोचू शकणार आहेत. 

नवी दिल्ली - कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात 17 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेले अनेक मजूर देशातील विविध भागात अडकून पडले आहेत. तसेच यापैकी अनेक जण मिळेल त्या मार्गाने आपल्या घरी परतण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान, लॉकडाऊनच्या अटीशर्थींमध्ये सूट देऊन मजुरांना घरी परतण्याची सशर्त परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर  विविध राज्यांची सरकारे आपल्या राज्यातील मजुरांना परत आणण्यासाठी काम सुरू केले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने 'श्रमिक स्पेशल ट्रेन' सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. मजूर, विद्यार्थी, पर्यटक, तीर्थस्थळांवर अडकलेले यात्रेकरू या विशेष ट्रेनने घरी पोहोचू शकणार आहेत. 

विविध राज्यांमध्ये अडकलेल्या मजूर, विद्यार्थी, पर्यटक आणि यात्रेकरूंना आपापल्या राज्यांमध्ये पाठवण्यासाठी रेल्वेने गेल्या पाच दिवसांत 70 विशेष ट्रेन सोडल्या आहेत. या विशेष ट्रेनद्वारे तब्बल 80 हजार नागरिकांना सोडण्यात आले आहे. रेल्वेने याबाबत आता माहिती दिली आहे. सोमवारपर्यंत एकूण  55 ट्रेनने आपली पहिली फेरी पूर्ण केली किंवा प्रवास सुरू केला, तर आणखी मंगळवारी 30 ट्रेन सोडण्यात आल्या असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगळुरू, सूरत, साबरमती, जालंधर, कोटा आणि एर्नाकुलम येथून या ट्रेन सुरुवातीला सोडण्यात आल्या. प्रत्येक ट्रेनमधून जवळपास हजार प्रवासी प्रवास करू शकतात. तसेच राज्यांनी रेल्वेकडे ट्रेन सोडण्याची विनंती केल्यानंतर रेल्वे प्रशासन आणखी ट्रेन सोडेल. अशा प्रकारच्या आणखी 500 ट्रेन रेल्वे सोडू शकतं असंही अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार, गुजरात, तेलंगण आणि आंध्र प्रदेशात ट्रेन सोडण्यात आल्या आहेत. 

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांनी येणाऱ्या आणि जणाऱ्या ट्रेनचे भाडे आम्ही भरणार असल्याचे सांगितले आहे. तर, झारखंड आणि बिहार राज्यांनी राज्यात येणाऱ्या ट्रेनचेच भाडे देण्याची तयारी दाखवली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग-धंदे बंद झाले आहेत. हातावर पोट असणाऱ्यांचे हाल झाले आहेत. याच दरम्यान बेरोजगारीची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. देशातील बेरोजगारीचा दर हा 27.1 टक्‍क्‍यांपर्यंत वाढला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) या संस्थेने बेरोजगारीची आकडेवारी जाहीर केली आहे. यामध्ये 3 मे रोजी संपलेल्या आठवड्यात देशातील बेरोजगारीचा दर 27.1 टक्‍क्‍यांपर्यंत वाढला आहे. लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका हा छोटे व्यावसायिक आणि मजुरांना बसला आहे. महिनाभरात 12 कोटींपेक्षा अधिक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : कोरोनाचा फटका! लॉकडाऊनमुळे कोट्यवधी लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndian Railwayभारतीय रेल्वेMumbaiमुंबईUttar Pradeshउत्तर प्रदेशBiharबिहारIndiaभारतMadhya Pradeshमध्य प्रदेशAndhra Pradeshआंध्र प्रदेश