शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
6
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
7
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
8
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
9
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
10
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
11
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
12
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
13
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
14
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
15
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
16
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
17
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
18
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
19
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
20
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे

CoronaVirus News : चिंताजनक; देशात 24 तासांत तब्बल 6,654 नवे कोरोनाबाधित; महाराष्‍ट्राची स्थिती गंभीर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2020 23:41 IST

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 6,654 नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर 137 जणांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देदेशात गेल्या आठवडाभरापासून रोज जवळपास पाच हजार नवे कोरोनाबाधित समोर येत आहेत.आतापर्यंत देशात 1,25,100 वर लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा आता 47,190 वर पोहोचला आहे.

नवी दिल्ली : लॉकडाउनमध्ये शिथिलता आणि काही प्रमाणावर ये-जा करण्याची सुविधा, यामुळे कोरोना संक्रमितांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. गेल्या आठवडाभरापासून रोज जवळपास पाच हजार नवे कोरोनाबाधित समोर येत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून तर या आकड्याने सह हजारचा टप्पाही ओलांडला आहे. शनिवारीही साडे सहा हजारहून अधिक नवे कोरोनाबाधित आढळून आले. याबरोबरच आता देशातील कोरोनाबाधितांचा आकडा सव्वा लाखच्या पुढे गेला आहे. यापैकी 3700 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

 CoronaVirus News : आनंदाची बातमी! कोरोना व्हॅक्सीनची आशा वाढली; ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची टेस्ट पुढच्या स्टेजवर

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 6,654 नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर 137 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात 1,25,100 वर लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 3720 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शनिवारी महाराष्ट्रात सर्वाधिक 60, गुजरातमध्ये 27, दिल्लीत 23, तामिलनाडूमध्ये 5, बंगालमध्ये 4, राजस्थानात 3, कर्नाटकात 2 आणि जम्मू-काश्मीर, पंजाब, उत्तराखंड आणि आंध्र प्रदेशात प्रत्येकी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राजधानी दिल्लीमध्ये आतापर्यंत एका दिवसात मरणारांचा हा सर्वाधिक आकडा आहे. 

GoodNews! देशातील 'या' जिल्ह्यांत रिकव्हरी रेटची 100 टक्क्यांकडे वाटचाल, कोरोनाला देतायत 'टफ फाईट'

महाराष्ट्राची स्थिती गंभीर - महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करूनही कोरोनाला लगाम घालणे अशक्य होत आहे. येथे शनिवारी 2608 रुग्णांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली. यामुळे कोरोनाबाधितांचा एकूण आकडा आता 47,190 वर पोहोचला आहे. त्यासोबतच, आज 821 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 13,404 कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी परतले आहेत. तर आता राज्यात एकूण 32,201 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 

PHOTO : 'या' देशात मोठी Tragedy बनलाय कोरोना, मृतदेह दफनायलाही कमी पडतेय जागा

दिल्लीत गेल्या पाच दिवसांपासून 500 नवीन कोरोनाबाधितराजधानी दिल्लीमध्ये गेल्या पाच दिवसांपासून सलग 500 हून अधिक नवे कोरोनाबाधित समोर येत आहेत. येथे शुक्रवारी सर्वाधिक 660 नवे  कोरोनाबाधित समोर आले.

CoronaVirus News: चीनने केले कोरोना व्हायरसवरील व्हॅक्सीनचे परीक्षण; दिसून आला आशादायक 'रिझल्ट'

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबईdelhiदिल्ली