शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

CoronaVirus News : धक्कादायक!; देशात गेल्या 24 तासांत 3,970 नवे कोरोनाबाधित, महाराष्ट्राची स्थिती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 11:29 PM

गुजरातमध्ये आज आढळलेल्या 1057 नव्या कोरोनाबाधितांमध्ये एकट्या अहमदाबादमधील 973 रुग्णांचा समावेश आहे. शहरात आतापर्यंत 8,144 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येतही सातत्याने वाढत होत आहे.

ठळक मुद्दे देशात गेल्या 24 तासांत 3,970 नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत. 1,057 रुग्ण शनिवारी एकट्या गुजरातमध्ये आढळून आले आहेत.देशातील कोरोना संक्रमितांची एकूण संख्या आता 85,940 झाली असून आतापर्यंत 2,752 जणांचा मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली :गुजरात, महाराष्ट्र, दिल्ली आणि तामिळनाडूतील वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येने देशाची स्थिती अधिक गंभीर होत चालली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आंकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 3,970 नवे कोरोनाबाधित समोर आले. यातील 1,057 रुग्ण एकट्या गुजरातमध्ये आढळून आले. तर आज 103 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना संक्रमितांची एकूण संख्या आता 85,940 झाली असून आतापर्यंत 2,752 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 30 हजारहून अधिक लोक ठणठणीत होऊन घरी परतले आहेत. 

आणखी वाचा - आनंदाची बातमी! : कोरोनावरील औषध सापडलं; 'ही' अँटीबॉडी 100 टक्के गुणकारी, अमेरिकन कंपनीचा दावा

आज एकट्या अहमदाबादमध्ये आढळले 973 कोरोना रुग्ण -गुजरातमध्ये आज आढळलेल्या 1057 नव्या कोरोनाबाधितांमध्ये एकट्या अहमदाबादमधील 973 रुग्णांचा समावेश आहे. शहरात आतापर्यंत 8,144 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 493 जणांचा मृत्यू झाला आहे. यांपैकी 14 जणांचा शनिवारी मृत्यू झाला. आतापर्यंत गुजरातमधील संक्रमितांचा आकडा 10,989वर पोहोचला आहे.

दिल्ली 10 हजारच्या जवळ, तामिळनाडू 10 हजारच्या पुढे -राजधानी दिल्लीतील कोरोना बाधितांचा आकडा आता 9,333 वर गेला आहे. येथे आज 438 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर आतापर्यंत दिल्लीत 129 लोकांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण दिल्ली सध्या रोडझोनमध्ये आहे. याशिवाय तामिळनाडूमध्ये आज 477 नवे रुग्ण आढळून आले. याबरोबरच येथील कोरोना रुग्णांचा आकडा 10,585 वर पोहोचला आहे. 

आणखी वाचा - धक्कादायक! कोरोना बरे झाल्यानंतरही सोडत नाही पिच्छा; चीनमधील डॉक्टरांनी दिला 'गंभीर' इशारा

महाराष्ट्राची स्थिती गंभीर -महाराष्ट्रातील कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढत होत आहे. हा आकडा आता तब्बल ३० हजार ७०६ वर जाऊन पोहोचला आहे. आज दिवसभरात राज्यात एकूण १६०६ नव्या रुग्णांचे निदान झाले. तर ५२४ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यभरात ७०८८ रुग्ण ठणठणीत होऊन घरी परतले आहेत. तर २२ हजार ४७९ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आणखी वाचा - आनंदाची बातमी : 'उवा' मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 'या' औषधाने काही तासांतच केला कोरोनाचा 'खात्मा'!; क्लिनिकल ट्रायल सुरू

महाराष्ट्रात आज ६७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची महाराष्ट्रात आज ६७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यात ४७ पुरुष तर २० महिलांचा समावेश आहे. या ६७ मृतांमध्ये ६० वर्ष किंवा त्यावरील ३८ रुग्ण आहेत, २५ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत, तर ४ जण ४० वर्षाखालील आहे. या ६७ रुग्णांपैकी ४४ जणांमध्ये (६६ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

आणखी वाचा - Lockdown : राहुल गांधींनी घेतली स्थलांतरित मजुरांची भेट, रस्त्यावर बसूनच साधला संवाद

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रGujaratगुजरातdelhiदिल्लीTamilnaduतामिळनाडूahmedabadअहमदाबाद