शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

CoronaVirus: महाराष्ट्राच्या दुरुस्तीमुळे मृतांची आकडेवारी 4 हजारांपर्यंत वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2021 06:27 IST

गेल्या सत्तर दिवसांतील सर्वात कमी नव्या रुग्णांची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : देशात गेल्या चोवीस तासांत कोरोनामुळे ४००२ जण मरण पावले अशी नोंद झाली असली तरी त्यातील २६१७ मृत एकट्या महाराष्ट्रातील आहेत. त्यापैकी २२१३ जण हे आधी दाखविण्यात आलेच नव्हते. महाराष्ट्राने ती माहिती शुक्रवारी उघड केली. त्यामुळे ही संख्या वजा केली असता राष्ट्रीय स्तरावर १७८९ जणच मरण पावले असल्याचे दिसून येते. मागील सत्तर दिवसांतील कोरोनाचे सर्वात कमी नवे रुग्णही आढळले आहेत.

याआधी बिहारनेही कोरोना मृतांच्या आकड्यात बुधवारी ३,९७१ने दुरुस्ती केल्याने त्यावेळी ही आकडेवारी ६१३८पर्यंत वाढली होती. गेल्या चोवीस तासांत ८४,३३२ नवे रुग्ण सापडले तर १ लाख २१ हजार ३११ रुग्ण बरे झाले. २ कोटी ९३ लाख ५९ हजार १५५ कोरोना रुग्णांपैकी २ कोटी ७९ लाख ११ हजार ३८४ जण बरे झाले आहेत. साथ सुरू झाल्यापासून ३ लाख ६७ हजार ८१ जण मरण पावले आहेत.

उपचार घेणाऱ्यांमध्ये गेल्या चोवीस तासांत ४०,९८१ने घट झाली आहे. १० लाख ८० हजार ६९० जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. ९५.६७ टक्के जण कोरोनातून बरे झाले आहेत. दर आठवड्याचा, दररोजचा संसर्ग दर अनुक्रमे ४.९४ टक्के व ४.३९ टक्के आहे. सलग १९व्या दिवशी संसर्ग दर १० टक्क्यांपेक्षा कमी आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.२५ टक्के आहे.३२.६२ कोटी कोरोना चाचण्या करण्यात आल्याची माहिती इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)ने दिली. आतापर्यंत कोरोना लसीचे २४ कोटी ९६ लाख ३०४ डोस दिले आहेत. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात १८ ते ४४ वयोगटातील ३.८५ कोटी जणांना कोरोना लस देण्यात आली. 

मेक्सिकोतील एक चतुर्थांशलोक कोरोनाबाधितn    मेक्सिकोतील १२.६ कोटी लोकसंख्येपैकी एक चतुर्थांश जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचा अंदाज आहे.n    तिथे राष्ट्रीय स्तरावर आरोग्यविषयक सर्वेक्षण करण्यात आले. त्यातील निष्कर्षांत म्हटले आहे की, ३.११ कोटी लोक कोरोनाबाधित झाले आहेत.

१७ कोटी६० लाखजगात  कोरोना रुग्ण असून त्यातील १५ कोटी ९६ लाख जण बरे झाले.६ लाख १४ हजारजणांचा बळी गेला व ५३ लाख ४५ हजार जणांवर उपचार सुरू आहेत.

३८ लाख लोकमरण पावले असून १ कोटी २२ लाख जणांवर उपचार सुरू आहेत. सर्वाधिक कोरोना रुग्ण अमेरिकेत असून तिथे ३ कोटी ४३ लाख बाधितांपैकी २ कोटी ८३ लाख लोक बरे झाले. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या