CoronaVirus, Lockdown Latest Marathi news and Live Updates corona virus uttar pradesh announce lockdown again | Lockdown : 'या' राज्यात शुक्रवारी रात्री 10 वाजल्यापासून पुन्हा लॉकडाउन, फक्त आवश्यक सेवाच राहणार सुरू

Lockdown : 'या' राज्यात शुक्रवारी रात्री 10 वाजल्यापासून पुन्हा लॉकडाउन, फक्त आवश्यक सेवाच राहणार सुरू

ठळक मुद्देयापूर्वी पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातही लॉकडाउन वाढवण्यात आला आहे.राज्यात शुक्रवारी रात्री 10 वाजल्यापासून 13 जुलै सकाळी 5 वाजेपर्यंत लॉकडाउनचा आदेश जारी करण्यात आला आहे.आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशात 2,69,789 एवढे अॅक्टिव्ह कोरोनाबाधित आहेत.

लखनौ - देशातील कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने आणि झपाट्याने वाढत आहे. यामुळे राज्य सरकारेदेखील आपापल्या राज्यांत लॉकडाउन वाढवत आहेत. आता उत्तर प्रदेशातही कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने पुन्हा लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. याअंतर्गत राज्यात शुक्रवारी रात्री 10 वाजल्यापासून 13 जुलै सकाळी 5 वाजेपर्यंत लॉकडाउनचा आदेश जारी करण्यात आला आहे. या काळात केवळ रुग्णालये आणि अत्यावश्यक सेवांची दुकानेच खुली राहतील.

उत्तर प्रदेशात वाढत चालेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येवर नियंत्र मिळवण्याच्या दृष्टीने मुख्य सचिव राजेंद्र तिवारी यांनी लॉकडाउनचा आदेश जारी केला आहे. या काळात सर्व शहरी आणि ग्रामीण भागातील बाजार, मंड्या आणि कार्यालये बंद राहतील. मात्र, या काळात आवश्यक सेवा सुरूच राहतील. 

या काळात मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवर बंदी राहणार नाही. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर वाहनांची ये-जा सुरूच राहील. तसेच रेल्वे सेवादेखील पूर्वीप्रमाणेच सुरू राहील.

यापूर्वी पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातही लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. महाराष्ट्रात लॉकडाउन 31 जुलैपर्यंत वाढवला आहे. याकाळात 'मिशन बिगीन अगेन'अंतर्गत देण्यात आलेल्या सर्व सवलती आणि नियमांमधील शिथीलता कायम ठेवण्यात आली आहे.

देशातील या 8 राज्यांत 90 टक्के अॅक्टिव्ह रुग्ण -
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशात 2,69,789 एवढे अॅक्टिव्ह कोरोनाबाधित आहेत. यापैकी 90 टक्के रुग्ण महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, कर्नाटक, तेलंगाणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये आहेत.

देशातील 86 टक्के मृत्यू केवळ 6 राज्यांत -
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जीओएमने माहिती दिली, की देशातील 86 टक्के कोरोनाबाधितांचे मृत्यू हे केवळ, महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या 6 राज्यांत झाले आहेत. तर 80 टक्के मृत्यू हे देशातील केवळ 32 जिल्ह्यात झाले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण 7,67,296 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4,76,377 लोक बरे झाले आहेत. तर 21,129 लोकांचा मृत्यू झाला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या -

ड्रॉप होऊ शकते कोरोना व्हॅक्सीनची तिसरी ट्रायल? ICMRच्या वरिष्ठ वैज्ञानिकानं दिलं असं उत्तर

खुशखबर...! औषध सापडलं...! एड्सबाधित रुग्ण झाला ठणठणीत; वैज्ञानिकांचा दावा

CoronaVirus News : धक्कादायक! 'या' 8 राज्यांत कोरोनाचे तब्बल 90 टक्के रुग्ण, 86 टक्के मृत्यू फक्त 6 राज्यात

CoronaVirus : धक्कादायक! कोरोनाचं नव रूप आलं समोर, अधिक वेगानं लोकांना करतोय संक्रमित; पण...

कोरोना तर पहिली लाट; जगाला भोगावे लागतील दूरगामी परिणाम - चीनची धमकी

English summary :
CoronaVirus,Lockdown Marathi News and Live Updates: corona virus uttar pradesh announce lockdown again

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus, Lockdown Latest Marathi news and Live Updates corona virus uttar pradesh announce lockdown again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.