शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
3
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
4
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
5
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
6
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
7
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
8
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
9
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
10
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
11
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
12
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा विस्फोट! गेल्या २४ तासांत ३,४९,६९१ नवे रुग्ण, २७६७ जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 10:46 AM

CoronaVirus Live Updates : देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ कोटी ६९ लाख झाली असून, त्यातील १ कोटी ४० लाख जण बरे झाले. या संसर्गाने आतापर्यंत १ लाख ९२ लाख जणांचा बळी घेतला आहे.

ठळक मुद्देदेशात कोरोनाच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या २६ लाख ८२ हजार इतकी आहे.

नवी दिल्ली : देशात गेल्या चोवीस तासांत ३ लाख ४९ हजार ६९१ नवे रुग्ण आढळले. तर दिसभरात कोरोनामुळे २७६७ जणांचा मृत्यू झाला तसेच २ लाख १७ हजार ११३ रुग्ण बरे झाले आहेत. जगातील इतर देशांपेक्षा भारतात सर्वाधिक नवे रुग्ण सापडले. (India reports 3,49,691 new COVID19 cases, 2,767 deaths and 2,17,113  discharges in the last 24 hours, as per Union Health Ministry)

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ कोटी ६९ लाख झाली असून, त्यातील १ कोटी ४० लाख जण बरे झाले. या संसर्गाने आतापर्यंत १ लाख ९२ लाख जणांचा बळी घेतला आहे. देशात कोरोनाच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या २६ लाख ८२ हजार इतकी आहे. काही आठवड्यांमध्ये भारतीय रेल्वेचे ९३ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना संसर्ग झाला आहे. 

दरम्यान, जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. चीनमधून वेगाने जगभरात पसरलेल्या कोरोनाचा फटका जवळपास सर्वच देशांना बसला आहे. जगातील कोरोना रुग्णांची संख्या ही आता तब्बल १४ कोटींच्या पुढे गेली असून लाखो लोकांना यामुळे जीव गमावला आहे. तर आता कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. त्याचबरोबर, देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे.

महाराष्ट्रात सक्रिय रुग्णसंख्या सात लाखांच्या उंबरठ्यावर; महिनाभरात तिपटीने वाढमहाराष्ट्रात कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या वाढली असून, गेल्या महिनाभरात त्यात तिपटीने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. २१ मार्च रोजी राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या २ लाख १० हजार १२० एवढी होती. ती २३ एप्रिल रोजी ६ लाख ९१ हजार ८५१ एवढी झाली आहे. सक्रिय रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे चिंता वाढल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवले. राज्यातील सक्रिय रुग्णांचा आकडा आता सात लाखांच्या उंबरठ्यावर आहे.

सक्रिय रुग्णसंख्येत महाराष्ट्र आघाडीवर असून, इतर राज्यांच्या तुलनेत राज्यातील सक्रिय रुग्णांचे प्रमाण ५५ टक्के असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या रोजची नोंद ६० हजारांच्या आसपास होत असताना सक्रिय रुग्णसंख्येत दररोज ६ ते १० हजारांनी भर पडत आहे. बुधवारी राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या ६,९५,७४७ एवढी होती, तर मंगळवारी ६,८३,८५६, सोमवारी ६,७६,५२०, रविवारी ६,७०,३८८, तर शनिवारी ६,४७,९३३, तसेच मागच्या शुक्रवारपर्यंत ६,३८,०३४ एवढी हाेती.

(Delhi Lockdown : दिल्लीत कोरोनाचे संकट वाढले, लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याची शक्यता)

राजधानी दिल्लीत गेल्या २४ तासांत ३५७ जणांचा मृत्यूदिल्लीत कोरोनाचा संसर्ग आता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सतत वाढत्या कोरोना संसर्गामुळे गेल्या २४ तासांच ३५७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २४१०३ नवे रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, आतापर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या ९३०८० वर पोहोचली आहे. गेल्या शुक्रवारी ३४८ लोकांचा मृत्यू झाला होता. तर २४३३१ नवीन रुग्णांचा कोरोनाची लागण झाली होती. गुरुवारी दिल्लीत कोरोना संसर्गाची २६१६९ नवीन प्रकरणे नोंदविली गेली. याशिवाय, ३०६ संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला होता. दिल्लीत गेल्या १० दिवसांत कोरोनामुळे १७५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत