शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

CoronaVirus Live Updates : हादरवणारी आकडेवारी! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,61,500 नवे रुग्ण, 1,501 जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2021 10:00 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या एक कोटी 47 लाखांवर पोहोचली आहे.

नवी दिल्ली - भारतातील कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. रुग्णसंख्येने पुन्हा एकदा रेकॉर्ड मोडला आहे. देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 2,61,500 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,501 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या एक कोटी 47 लाखांवर पोहोचली आहे. 

कोरोनामुळे देशात तब्बल 1,77,150 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. रविवारी (18 एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,61,500 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,47,88,109 पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा एक लाख 77 हजारांवर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 18,01,316 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,28,09,643 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 

कोरोना रुग्णालयाच्या ICU मध्ये भीषण आग; 5 जणांचा मृत्यू  

कोरोनामुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कोरोना रुग्णालयाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू होते. याच दरम्यान आयसीयू (ICU) मध्ये भीषण आग लागली आहे. आग लागली त्यावेळेस जवळपास 50 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती मिळत आहे. 

बापरे! कोरोनाचा नवा स्ट्रेन थेट डोळे आणि कानावर करतोय अटॅक; पाहण्याची, ऐकण्याची क्षमता होतेय कमी

कोरोनावर जगभरात युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. संशोधनातून नवनवीन माहिती समोर येत आहे. कोरोनाची आणखी दोन नवीन लक्षणं आता समोर आली आहेत. रिसर्चमधून धडकी भरवणारी माहिती मिळत आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेन हा आता थेट डोळे आणि कानावर अटॅक करत आहे. त्यामुळेच पाहण्याची, ऐकण्याची क्षमता कमी होत असल्याचा धक्कादायक खुलासा संशोधनातून करण्यात आला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना संक्रमणाचा थेट परिणाम हा कान आणि डोळ्यांवर होत आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेन मुख्य लक्षण असणाऱ्या तापाबरोबरच डायरिया, पोटदुखी, उलटी होणे, अपचन यांसारखी लक्षण दाखवत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना नवनवीन लक्षणं समोर येत आहेत. एसजीपीजीआई (SGPGI) आणि केजीएमयू (KGMU) सह अनेक कोरोना रुग्णालयात भरती असणाऱ्या रुग्णांना ऐकण्याची आणि दिसण्याची समस्या येते आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस