CoronaVirus Live Updates : कोरोना रुग्णालयाच्या ICU मध्ये भीषण आग; 5 जणांचा मृत्यू  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 09:00 AM2021-04-18T09:00:29+5:302021-04-18T09:15:31+5:30

CoronaVirus Live Updates 5 Dead In Fire At Rajdhani Hospital : अग्निशमन दलाच्या जवानांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.  

CoronaVirus Live Updates 5 dead in fire at rajdhani hospital raipur | CoronaVirus Live Updates : कोरोना रुग्णालयाच्या ICU मध्ये भीषण आग; 5 जणांचा मृत्यू  

CoronaVirus Live Updates : कोरोना रुग्णालयाच्या ICU मध्ये भीषण आग; 5 जणांचा मृत्यू  

googlenewsNext

नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. कोरोनामुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कोरोना रुग्णालयाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू होते. याच दरम्यान आयसीयू (ICU) मध्ये भीषण आग लागली आहे. आग लागली त्यावेळेस जवळपास 50 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती मिळत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, रायपुरच्या पचपेडी नाक्यावर राजधानी रुग्णालय आहे. या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू होते. शॉर्ट सर्किटमुळे रुग्णालयात अचानक आग लागली आणि आयसीयूमध्ये मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला. त्यानंतर खिडकी तोडून धूर बाहेर काढण्यात आला आणि आगीवर नियंत्रण आणण्यात आलं. मात्र यामध्ये पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या रुग्णांना उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.  

रुग्णालयातील पंख्याला झालेलं शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं सांगितलं जात आहे. तसेच रुग्णालयाच्या खिडक्या तोडून धूर बाहेर काढण्यात आल्याने अनेक रुग्णांचा जीव बचावला आहे. आग लागल्यानंतर तातडीने रुग्णांना बाहेर काढण्यात आलं. तसेच काही रुग्ण स्वत:च उठून बाहेर निघून गेले. ज्या आयसीयू सेंटरला आग लागली होती, तेथे गोंधळ निर्माण झाला. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे या आगीने भीषण रुप घेतल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना मदतनिधी देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

भयावह! स्मशानभूमीत कमी पडतेय जागा; रहिवाशी कॉलनीत मृतदेहावर अंत्यसंस्कार; घटनेने खळबळ

मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात बेड मिळत नाही आहेत. तर दुसरीकडे अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत जागा कमी पडत आहे. याच दरम्यान धडकी भरवणारी घटना समोर आली आहे. रहिवासी कॉलनीमध्ये मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. या घटनेचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

Web Title: CoronaVirus Live Updates 5 dead in fire at rajdhani hospital raipur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.