CoronaVirus Live Updates : कोरोनामुळे पतीचा मृत्यू, धक्क्याने पत्नीची सॅनिटायझर पिऊन आत्महत्या; 6 वर्षांचा लेक झाला पोरका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 04:34 PM2021-04-28T16:34:30+5:302021-04-28T16:47:04+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : हसतं-खेळतं कुटुंब कोरोनामुळे उद्ध्वस्त झालं आहे. कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मात्र पतीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने पत्नीने सॅनिटायझर पिऊन आत्महत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. 

CoronaVirus Live Updates husband and wife died in kanpur coronavirus news | CoronaVirus Live Updates : कोरोनामुळे पतीचा मृत्यू, धक्क्याने पत्नीची सॅनिटायझर पिऊन आत्महत्या; 6 वर्षांचा लेक झाला पोरका

CoronaVirus Live Updates : कोरोनामुळे पतीचा मृत्यू, धक्क्याने पत्नीची सॅनिटायझर पिऊन आत्महत्या; 6 वर्षांचा लेक झाला पोरका

Next

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 3 लाखांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर अनेकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. कोरोनामुळे अनेक कुटुंबाची वाताहत झाली आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. हसतं-खेळतं कुटुंब कोरोनामुळे उद्ध्वस्त झालं आहे. कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मात्र पतीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने पत्नीने सॅनिटायझर पिऊन आत्महत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील सफीपूरमध्ये ही मन सुन्न करणारी घटना घडली आहे. कोरोनामुळे पतीचा मृत्यू झाल्यानंतर पत्नीने सॅनिटायझर पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. त्रिवेदी कुटुंबातील एका सदस्यांचा कोरोना रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी एका खासगी नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. याच दरम्यान त्यांची ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्यावर ऑक्सिजन देखील देण्यात आला. 

त्रिवेदी यांच्यावर योग्य उपचार सुरू होते. मात्र याच दरम्यान अचानक त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे नातेवाईकांनी रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप केला असून अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे. तसेच कारवाईची मागणी केली आहे. मात्र पतीच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने त्रिवेदी यांच्या पत्नी अंजली यांनी सॅनिटायझर पिऊन आत्महत्या केली आहे. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं त्रिवेदी दाम्पत्याला एक सहा वर्षांचा मुलगा आहे. आई-बाबांचा मृत्यू झाल्याने तो आता पोरका झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

बापरे! कोरोनामुळे कुटुंबातील तिघांचा मृत्यू, धक्क्याने सुनेनेही केली आत्महत्या; मन हेलावणारी घटना

कोरोनामुळे एका कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. हा धक्का सहन न झाल्याने सुनेने आत्महत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या देवासमध्ये ही मन सुन्न करणारी घटना घडली. देवासच्या अग्रवाल समाजाचे अध्यक्ष बालकिशन गर्ग यांची पत्नी आणि दोन मुलांचं कोरोनामुळे निधन झालं. मात्र कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू सहन न झाल्याने छोट्या सुनेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 

हृदयद्रावक! 7 दिवसांत 17 लाख खर्च केले तरी कोरोनामुळे आई-बाबा गमावले; दीड वर्षांच्या चिमुकल्याने दिला मुखाग्नी

कोरोनामुळे एक हसतं-खेळतं घर काही दिवसांत उद्ध्वस्त झालं आहे. 7 दिवसांत तब्बल 17 लाख खर्च करूनही एका चिमुकल्यापासून कोरोनाने त्याचे आई-बाबा हिरावले आहेत. कोरोनाच्या विळख्यात अख्ख कुटुंब सापडलं. उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी जायसवाल कुटुंबातील दाम्पत्याला आणि त्यांच्या दोन्ही मुलांना कोरोनाची लागण झाली. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. या उपचारासाठी लाखोंचा खर्च करण्यात आला. मात्र तरी देखील कोरोनाने चिमुकल्यांपासून त्यांचे आईवडील कायमचेच हिरावले आहेत. अवघ्या दीड वर्षाच्या चिमुकल्याने आपल्या आई-बाबांना मुखाग्नी दिला आहे. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. 

Web Title: CoronaVirus Live Updates husband and wife died in kanpur coronavirus news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.