शहरं
Join us  
Trending Stories
1
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
2
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
3
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
4
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
5
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
6
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
7
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
8
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
9
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
10
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
11
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
12
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
13
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
14
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
15
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
16
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
17
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
18
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
19
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
20
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा

CoronaVirus Live Updates : हृदयद्रावक! ...अन् साता जन्माची साथ अवघ्या 23 दिवसांत सुटली; नवरदेवाने कोरोनामुळे गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 2:26 PM

CoronaVirus Marathi News and Live Updates : नवरदेवाला लग्नानंतर कोरोनाची लागण झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला आहे. 

नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या दोन कोटींच्या वर गेली असून मृतांचा आकडा देखील वाढत आहे. कोरोनामुळे काही राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. अशातच काही ठिकाणी लग्न सोहळ्याचं आयोजन केलं जात आहे. मात्र यामुळे संसर्गाचा धोका देखील अधिक वाढत असल्याचं दिसून येत आहे. याच दरम्यान एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. साताजन्माची गाठ अवघ्या 23 दिवसांत सुटल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. नवरदेवाला लग्नानंतर कोरोनाची लागण झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला आहे. 

कोरोना काळात लग्न सोहळ्याचं आयोजन करणं थेट जीवावर बेतल्याची मन हेलावून टाकणारी घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे. लग्नाच्या 23 दिवसांनंतर नवरदेवाला कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. मध्य प्रदेशातील राजगढ जिल्ह्यातील अजय शर्मा या 25 वर्षीय तरुणाचा 25 एप्रिल रोजी सिहोर येथे विवाह झाला. कोरोना नियमांचे पालन करत एका मंदिरात मर्यादित लोकांमध्ये हा विवाह पार पडला होता. मात्र लग्नानंतर चार-पाच दिवसानंतर अजयची तब्येत बिघडली आणि शेवटी 29 एप्रिल रोजी त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. कुटुंबातील सदस्यांपैकी एक महिलाही कोरोना पॉझिटिव्ह आढळली.

मिळालेल्या माहितीनुसार, अजय पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्यावर स्थानिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू करण्यात आले. मात्र प्रकृती अधिक खालावत चालल्याने त्याला भोपाळला हलविण्यात आले. भोपाळच्या रुग्णालयात एक आठवडा अजय व्हेंटिलेटरवर होता. मात्र उपचारांचा काहीच फायदा झाला नाही. अखेर कोरोनामुळे त्याचा मृत्यू झाला. अजयचा विवाह राजगढ जिल्ह्यातील नरसिंहगढ ब्लॉकमधील मोतीपुरा गावातील अन्नू शर्मा नावाच्या तरुणीशी झाला. अन्नूचे कुटुंब सिहोरमध्ये वास्तव्यास असल्याने विवाह तेथेच पार पडला. या विवाहात कुटुंबातील काही निवडक सदस्यच उपस्थित होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

जीवघेणा ठरला विवाह सोहळा! लग्नाच्या 5 दिवसांनंतर नवरदेवाचा कोरोनामुळे मृत्यू; गावात संसर्गाचा मोठा धोका

लग्न समारंभाला हजेरी लावणं काही लोकांना चांगलंच महागात पडलं आहे. कोरोनामुळे लग्नाच्या पाच दिवसानंतर नवरदेवाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ओडिशातील केंद्रपाडा जिल्ह्यात मन सुन्न करणारी घटना घडली आहे. जिल्ह्यातील एका 26 वर्षीय तरुणाला कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्या लग्नाला अवघे पाच दिवस होत नाहीत तोवर त्याचा मृत्यू झाला आहे. नवरदेवाचा कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. अनेक लोकांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा संपन्न झाला होता. त्यामुळे लग्नाला हजेरी लावलेल्या सर्वांचा शोध आता प्रशासनाच्या शोध घेऊन आणि त्यांची चाचणी करण्याचं काम अधिकाऱ्यांनी सुरू केलं आहे. यामुळे कोरोना संक्रमणाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMadhya Pradeshमध्य प्रदेशmarriageलग्नDeathमृत्यू