शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

Coronavirus : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना कोरोनाची लागण; झाले होम क्वारंटाईन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 11:25 AM

Coronavirus : अखिलेश यादव झाले होम क्वारंटाईन, योगी आदित्यनाथांच्या कार्यालयातील कर्मचारीही पॉझिटिव्ह

ठळक मुद्दे अखिलेश यादव झाले होम क्वारंटाईनयोगी आदित्यनाथांच्या कार्यालयातील कर्मचारीही पॉझिटिव्ह

गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थित सरकारकडून काळजी घेण्याचं आवाहनही करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ नोंदवली जात आहे. दरम्यान, समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी ट्विटरवरून यासंदर्भात माहिती दिली. तसंच आपण स्वत: आयसोलेशनमध्ये असल्याचंही त्यांनी सांगितलं. "माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी आयसोलेशमध्ये असून घरातच उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनीही त्यांची कोरोना चाचणी करून घ्यावी. त्या सर्वांनी काही दिवस आयसोलेशनमध्ये राहावं अशी विनंती मी करत आहे," असं अखिलेश यादव म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली. काही दिवसांपासून त्यांना हलका ताप होता. त्यानंतर त्यांनी कोरोनाची चाचणी केली. यामध्ये त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचं सांगण्यात आलं. योगी आदित्यनाथांच्या कार्यालयातील कर्मचारीही पॉझिटिव्हकोरोना विषाणूनं संपूर्ण देशात थैमान घातलं आहे. आता याचा प्रकोप उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहोचला आहे. यामुळेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतःला आयसोलेट केले आहे. त्यांच्या कार्यालयातील काही अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आता सर्व कामे व्हर्च्युअली करतील.''माझ्या कार्यालयातील काही अधिकारी कोरोना संक्रमित झाले आहेत. हे अधिकारी माझ्या संपर्कात होते, त्यामुळे खबरदारी म्हणून मी स्वतःला आयसोलेट केले आहे आणि सर्व कामे व्हर्च्युअली सुरू करत आहे,'' असं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं होतं. 

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवUttar Pradeshउत्तर प्रदेशSamajwadi Partyसमाजवादी पार्टीyogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाcorona virusकोरोना वायरस बातम्या