शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
6
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
7
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
8
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
9
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
10
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
11
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
12
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
13
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
14
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
15
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
16
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
17
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
18
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
19
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
20
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक

खूशखबर! रशियन कोरोना लस Sputnik-Vची पहिली खेप भारतात दाखल; जाणून घ्या, किती आहे प्रभावी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2021 6:09 PM

स्पुतनिक-V ही 11 ऑगस्ट, 2020 रोजी रशियाने नोंदणी केलेली जगातील पहिलीच कोरोना लस आहे. ही लस गमालेया नॅशनल रिसर्च सेंटर ऑफ एपिडेमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीने विकसित केली आहे.

नवी दिल्ली - कोरोना संकट आणि अनेक गोष्टींबरोबरच लशीच्या तुटवड्याचाही सामना करत असलेल्या भारतासाठी आनंदाची बातमी आहे. रशियन लस स्पुतनिक-V ची पहिली खेप शनिवारी हैदराबादेत दाखल झाली. ही लस कोरोना व्हायरस विरोधत 90 टक्क्यांहून अधिक प्रभावी असल्याचे बोलले जाते. लसीकरण कार्यक्रमाची गती वाढविण्यासाठी केंद्र सरकारने नुकतीच स्पुतनिक -V ला इमेरजन्सी वापराची परवानगी दिली होती.

भारतात रशियाचे राजदूत म्हणाले, स्पुतनिक-V ची एफिकसी (प्रभाव) जगातील अनेक लशींपेक्षा अधिक आहे. तसेच ही लस कोरोनाच्या नव्या स्ट्रेनविरोधातही प्रभावी आहे. याचे लोकल प्रोडक्शनही लवकरच सुरू होईल. ते नियोजनबद्ध पद्धतीने वाढवून दरवर्षी 850 मिलियन (85 कोटी) डोसपर्यंत नेले जाईल.

CoronaVirus: भारतावर कोरोना संकट, परदेशी माध्यमांत पंतप्रधान मोदींवर प्रचंड टीका!

स्पुतनिक-V ही 11 ऑगस्ट, 2020 रोजी रशियाने नोंदणी केलेली जगातील पहिलीच कोरोना लस आहे. ही लस गमालेया नॅशनल रिसर्च सेंटर ऑफ एपिडेमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीने विकसित केली आहे.

लसीकरणाचा वेग वाढणार -भारतात 18 ते 44 वर्ष वयोगटातील लोकांसाठी तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. तिसऱ्या टप्प्यावरील लसीकरणासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन नोंदणी केली आहे. मात्र, अनेक ठिकाणी लशींच्या कमतरतेमुळे लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला आज सुरुवात होऊ शकली नाही. मात्र, आता रशियन लस आल्याने लसीकरण कार्यक्रमाला गती मिळण्याची आशा आहे. 

अशी आहे भारताची स्थिती -मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी कोरोना रुग्णांच्या आकडेवारीनं नवा विक्रम केला आहे. देशात पहिल्यांदा एकाच दिवसात कोरोनाचे 4 लाखाहून अधिक रुग्ण सापडले आहेत. गेल्या 24 तासांत देशात 4 लाख 1 हजार 993 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 3 हजार 523 जणांचा मृत्यू झाला. गेल्या 24 तासांत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 2 लाख 99 हजार 988 इतकी आहे.

CoronaVirus: सोनिया गांधींचा सरकारला सल्ला; सर्व पक्षांच्या सल्ल्यानं कोरोनाविरोधी रणनिती आखा, काँग्रेसही साथ देईल 

कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 91 लाख 64 हजारच्या पुढे -देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 91 लाख 64 हजार 969 वर जाऊन पोहोचली आहे. यापैकी 1 कोटी 56 लाख 84 हजार 406 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 2 लाख 11 हजार जणांचा मृत्यू झाला. सध्याच्या घडीला देशात 32 लाख 68 हजार 710 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाची लागण होणाऱ्यांचे प्रमाण दिवसागणिक वाढत असल्याने रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे. अनेक राज्यांमधील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसrussiaरशियाmedicineऔषधं