Coronavirus: लॉकडाऊन काळात मध्यरात्रीतच बस सुरू, पायी जाणाऱ्यांना पोहोचवलं त्यांच्या गावी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 03:47 PM2020-03-28T15:47:37+5:302020-03-28T15:49:22+5:30

डोक्यावर कडक ऊऩ़, रस्ता सुनसाऩ़, हातात कपड्यांची बॅग़, एकही गाडी ये-जा करीत नव्हती़..आई व वडिलांचे हात धरून चिमुकले रस्ता भरभर पार करीत होते़.

Coronavirus: During the lockdown, the buses started at midnight, transported the citizens to their village in uttar pradesh yogi sarkar | Coronavirus: लॉकडाऊन काळात मध्यरात्रीतच बस सुरू, पायी जाणाऱ्यांना पोहोचवलं त्यांच्या गावी

Coronavirus: लॉकडाऊन काळात मध्यरात्रीतच बस सुरू, पायी जाणाऱ्यांना पोहोचवलं त्यांच्या गावी

Next

वाराणसी - कोरोनाच्या भितीने शहरं ओस पडत असून गड्या आपला गावच बरा... असे म्हणत गावांकडे जाण्यासाठी लोकं धडपडत आहेत. केंद्र सरकारने २१ दिवसांचे लॉक डाऊन केल्यामुळे देशभरातील ट्रान्सपोर्ट सेवा बंद करण्यात आली आहे. बससेवा, रेल्वेसेवा, विमानसेवा आणि खासगी वाहतूकही बंद आहे. त्यामुळे, मिळेल ते वाहन करुन, किंवा प्रसंगी पायी चालत आपलं गाव गाठण्यात येत आहे. मुंबईत राहणारे परराज्यातील नागरिकही आपलं गाव गाठण्यासाठी पायी प्रवास करत आहेत. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील कामगारांचे लोंढे गावाकडे निघाले आहेत. त्या पार्श्वभूमीर उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने रातोरात १००० बसची सोय करुन राज्यात आलेल्या नागरिकांना हवं त्या ठिकाणी सोडण्याची सोय केली, असे वृत्त नवभारत टाईम्सने दिले आहे.  

डोक्यावर कडक ऊऩ़, रस्ता सुनसाऩ़, हातात कपड्यांची बॅग़, एकही गाडी ये-जा करीत नव्हती़..आई व वडिलांचे हात धरून चिमुकले रस्ता भरभर पार करीत होते़.. मिळेल अन् दिसेल तेथे पाण्याची तहान भागविली..जवळ असलेल्या चुरमुऱ्यायांवर तीन दिवस, दोन रात्र काढून २५० किलोमीटर चालत चालत कसेबसे सोलापूर गाठले.... अशीच परिस्थिती देशाच्या अनेक राज्यातील गावांकडे आहे. मुंबई, पुणे आणि महानगरांतून लोकं कुटुंबासह आपल्या गावाकडे पलायन करत आहेत. देशात २१ दिवसांचे लॉकडाऊन असल्याने हाताला काम नाही, पोटला अन्न नाही अन् आजुबाजूला कोरोनाची धास्ती असल्याने जो-तो गावचा रस्ता धरत आहेत. उत्तर प्रदेशातून परराज्यात कामासाठी गेलेले नागरिकही आता गावी परतत आहेत. याबाबत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तत्परता दाखवली आहे. 

उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोकांना त्यांच्या हव्या असलेल्या ठिकाणी पोहोचविण्यासाठी योगी सरकारने १००० बसची सोय केल्याची माहिती तेथील एका सरकारी अधिकाऱ्याने दिली. त्यासाठी परिवहन अधिकाऱ्यांनी रात्रीच सर्व बसड्रायव्हर आणि  कंडक्टर्स यांना ड्युटीवर पाचारण केले. योगी आदित्यनाथ यांनी रात्रभर जागून दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, बुलंदशहर, अलीगढ, हापूड या शहरांत बसेस उभा करुन आलेल्या नागरिकांना त्यांच्या मूळगावी जाण्याची सोय केली. तसेच या नागरिकांची जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली होती. 

Web Title: Coronavirus: During the lockdown, the buses started at midnight, transported the citizens to their village in uttar pradesh yogi sarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.