शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

Coronavirus: दारू महागली! 'या' राज्यात मद्यावर ७० टक्के अतिरिक्त कर लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2020 7:46 AM

सरकारच्या या निर्णयामुळे कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी राबविण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्येच मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या महसुलाला चालना मिळणार आहे.

ठळक मुद्देसोमवारपासून अनेक राज्यांमध्ये दारूची दुकानं उघडल्यामुळे मद्यप्रेमींच्या दुकानाबाहेर लांबच लांब रांग लागल्याचं पाहायला मिळालं. दारूच्या दुकानाबाहेर सामाजिक अंतराचे नियम लोकांनी धाब्यावर बसवल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने सोमवारी अहवाल तयार केला आणि दुकानांमध्ये जास्त गर्दी होऊ नये म्हणून दारू विक्रीची वेळ वाढवण्याचा प्रस्ताव दिला. दिल्ली सरकारने मंगळवारपासून दारू विक्रीवर 70 टक्के कोरोना महारोगराई कर लादण्याचा निर्णय घेतला असून, त्याला 'स्पेशल कोरोना फी' असे नाव देण्यात आले आहे.

नवी दिल्लीः सोमवारपासून अनेक राज्यांमध्ये दारूची दुकानं उघडल्यामुळे मद्यप्रेमींच्या दुकानाबाहेर लांबच लांब रांग लागल्याचं पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी सोशल डिन्स्टसिंगचे तीनतेरा वाजलेले दिसले. दारूच्या दुकानाबाहेर सामाजिक अंतराचे नियम लोकांनी धाब्यावर बसवल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने सोमवारी अहवाल तयार केला आणि दुकानांमध्ये जास्त गर्दी होऊ नये म्हणून दारू विक्रीची वेळ वाढवण्याचा प्रस्ताव दिला. राजधानी दिल्लीत ४० दिवसांहून अधिक काळानंतर सोमवारी मद्याची दुकाने उघडली गेली आणि दुकानाबाहेर लोक सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करीत नसल्यामुळे अनेक दुकानं बंद करावी लागली. त्यामुळेच दिल्ली सरकारनेही मद्यावर अतिरिक्त 70 टक्के कोरोना महारोगराई कर लादण्याचा निर्णय घेतला असून, त्याची अंमलबजावणी मंगळवारपासून करण्यात येणार आहे.स्पेशल ब्रँचनं सांगितलं असं काहीविशेष शाखेच्या अहवालात असे म्हटले आहे की, जास्त गर्दी टाळण्यासाठी दारू विक्रीची वेळ वाढवता येऊ शकते आणि दुकानांमध्ये दारूचा पुरेसा साठा उपलब्ध झाला पाहिजे. कारण लोक त्यांच्या गरजेपेक्षा जास्त मद्य खरेदी करणार आहेत, यासाठी विशेष शाखेने कित्येक मुद्दे एकत्र तयार करून तो अहवाल दिल्ली सरकारला सुपूर्द केला आहे.मंगळवारपासून सरकार करणार हे कामदिल्ली सरकारने मंगळवारपासून दारू विक्रीवर 70 टक्के कोरोना महारोगराई कर लादण्याचा निर्णय घेतला असून, त्याला 'स्पेशल कोरोना फी' असे नाव देण्यात आले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी राबविण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्येच मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या महसुलाला चालना मिळणार आहे. हा नियम मंगळवार सकाळपासून लागू झाला असून, मद्यपान करणार्‍यांना आता अधिक पैसे मोजावे लागतील हेसुद्धा स्पष्ट करण्यात आले आहे.मुख्यमंत्री केजरीवाल यांचा मद्यप्रेमींना इशारासीएम केजरीवाल म्हणाले की, केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानंतर दिल्ली रेड झोनमध्ये असताना आम्ही काही अटींसह दारूविक्रीला सूट दिली होती, परंतु काही ठिकाणी सामाजिक अंतर न पाळता त्याची थट्टा केली गेली आहे. ते आम्हाला कधीच मान्य होणार नाही. पुन्हा असा प्रकार आढळून आल्यास संबंधित भाग सील करू, असा इशाराच केजरीवालांनी दिला आहे. आर्थिक कामकाजादरम्यान दुकानदारांनाही आपली जबाबदारी समजून घ्यावी लागेल. काही लोकांमुळे आपण संपूर्ण दिल्लीला धोक्यात घालू शकत नाही. सोमवारी दारूच्या दुकानांबाहेर झालेल्या गोंधळानंतर केजरीवालांनी हा इशारा दिला आहे. अन्य महत्त्वाच्या बातम्या

राज्य सरकारचा मोठा निर्णय! यंदा नोकरभरती नाही; खर्चाला ६७% कात्री६०० कोटींची उलाढाल लॉकडाऊनमुळे थंडावली; देशातील आर्थिक घडामोडी ठप्पराज्यात कोरोनाचे १४ हजार ५४१ रुग्ण; मुंबईतील बाधितांची संख्या ९,३१०

CoronaVirus: धक्कादायक! कोरोनाची रहस्यमय माहिती असलेली चीनमधील प्रसिद्ध 'बॅट वुमन' अचानक गायब

फेसबुकनंतर जिओचा आणखी एक मोठा करार; अमेरिकेच्या 'या' कंपनीसोबत मिळवला हात

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्ली