शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
3
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
4
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
5
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
6
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
7
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
8
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
9
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
10
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
11
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
12
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
13
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
14
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
15
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
16
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
17
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
18
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
19
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
20
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: “मोदी ‘सिस्टिम’ला झोपेतून जागे करणे गरजेचे”: राहुल गांधींचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 13:30 IST

CoronaVirus: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे.

ठळक मुद्देराहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोलमोदी ‘सिस्टिम’ला झोपेतून जागे करणे गरजेचेट्विटरच्या माध्यमातून केंद्र सरकारवर साधला निशाणा

नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. नव्या कोरोनाबाधितांची संख्या काही अंशी घटताना दिसत असली, तरी कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या चिंता वाढवणारी आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण येत असून, कोरोना लस, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स यांचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. मोदी सिस्टिमला झोपेतून जागे करणे गरजेचे आहे, असे राहुल गांधींनी म्हटले आहे. (coronavirus congress rahul gandhi says modi systems need to wake up)

गेल्या अनेक दिवसांपासून राहुल गांधी सातत्याने केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींवर टीका करत आहे. कोरोना लसीकरण मोहीम, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन यांवरून विरोधक केंद्रातील मोदी सरकारवर टीका करत आहेत. अशातच पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. 

मोदी ‘सिस्टिम’ला झोपेतून जागे करणे गरजेचे

आगामी काळात मुलांना कोरोनापासून संरक्षित करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत बालरोग सेवा आणि लस उपचार प्रोटोकॉल आधीच तयार करणे आवश्यक आहे. भारताच्या भविष्यासाठी मोदी सिस्टिमला झोपेतून उठवणे आवश्यक आहे, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. यापूर्वीही पीएमकेअरचे व्हेंटिलेटर आणि पंतप्रधान यांच्यात अनेक समानता आहेत. हे दोघेही जास्त खोटा प्रचार करतात – हे दोघेही आपले काम करण्यात अपयशी ठरतात – दोघांनाही सापडणे कठीण आहे, अशी टीका राहुल गांधीनी केली होती. 

चिंतेत भर! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत २६९ डॉक्टरांनी गमावला जीव; बिहारमध्ये सर्वाधिक मृत्यू

देशात कोणाच्याही जीवाची किंमत राहिलेली नाही

दुसऱ्या देशातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी भारतातून कोरोना लसींचे डोस परदेशात पाठवण्यात आले. जेणेकरून तेथून येणारे नागरिक भारतात आल्यावर कोरोनाचा फैलाव होऊ नये. याचाच अर्थ केंद्रातील मोदी सरकारला दुसऱ्या देशातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अधिक चिंता होती. त्यासाठीच एक कोटी कोरोना लसी पाठवण्यात आल्या. यावर हसावं की रडावं हेच समजत नाही. आता सत्य बाहेर पडू लागले, तेव्हा सर्व लसी निर्यात केलेल्या नाहीत, अशी सारवासरव केंद्र सरकार करत आहे, असे रवीश कुमार यांनी म्हटले आहे. 

उत्तर प्रदेशमधील आरोग्य व्यवस्था ‘राम भरोसे’; हायकोर्टाने योगी सरकारला सुनावले

दरम्यान, देशात गेल्या २४ तासात २,६३,५३३ नवीन कोरोना रुग्ण आढळले. तर ४,२२,४३६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ४,३२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या भारतात ३३,५३,७६५ रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच १८ कोटी ४४ लाख ५३ हजार १४९ जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकारPoliticsराजकारण