शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
2
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
3
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
4
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
5
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
6
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
7
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
8
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
9
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
10
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
11
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा टोला
12
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
13
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
14
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
15
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
16
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
17
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
18
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
19
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
20
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : 15 जिल्हे सील करण्याच्या निर्णयानंतर उत्तर प्रदेशात गोंधळ, खरेदीसाठी झुंबड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 19:51 IST

उत्तर प्रदेश सरकारने कोरोनाला रोखण्यासाठी कठोर पावले उचलली असून, सरकारने लखनौसह राज्यातील 15 जिल्ह्यातील हॉटस्पॉट पूर्णपणे सील केले आहेत.

लखनौ - कोरोनाचा वाढता फैलाव विचारात घेऊन उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील 15 जिल्ह्यातील हॉटस्पॉट भाग सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार आज रात्री 12 वाजल्यापासून या 15 जिल्ह्यात अनेक भाग सील करण्यात येतील. दरम्यान, हे वृत्त आल्यापासून राज्यात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी लोकांनी खरेदीसाठी गर्दी केली. 

उत्तर प्रदेश सरकारने लखनौसह राज्यातील 15 जिल्ह्यातील हॉटस्पॉट पूर्णपणे सील केले आहेत. योगी सरकारने सील केलेल्या 15 जिल्ह्यांमध्ये आग्रा, शामली, मीरत, बरेली, कानपुर, वाराणसी, लखनौ, बस्ती, गाझियाबाद, गौतमबुद्धनगर, महाराजगंज, सीतापूर, बुलदंशहर, फिरोजाबाद आणि नोएडा या जिल्ह्यांचा समावेश आहे. दरम्यान,  या जिल्ह्यातील अनेक भागात नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसत आहे.  

नोएडा, गाझियाबाद, लखनौ आदी शहरात किराणा आणि जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये गर्दी दिसून आली. सरकारी अधिकाऱ्यांनी जीवनावश्यक वस्तूंचा घरपोच पुरवठा होणार असल्याचे सांगितल्यानंतरही लोकांनी गर्दी केली. 

 कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. मात्र लॉकडाऊनदरम्यानही काही ठिकाणी कोरोनाचा संसर्ग वेगाने होत असल्याचे समोर येत आहे. त्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने कठोर पावले उचलली आहेत. उत्तर प्रदेश सरकारने लखनौसह राज्यातील 15 जिल्ह्यातील हॉटस्पॉट पूर्णपणे सील केले आहेत. सील करण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये तबलिगी जमाती आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचे चाचणी अहवाल सातत्याने पॉझिटिव्ह येत आहेत. 

 या 15 जिल्ह्यांतील हॉटस्पॉट परिसरांमध्ये बुधवारी रात्री 12 वाजल्यापासून 13 एप्रिलपर्यंत पूर्ण निर्बंध लागू असतील. या काळात जनतेला घरातून बाहेर पडण्याचीही परवानगी नसेल. या सर्व जिल्ह्यांतील सर्व घरांना सॅनिटाइझ करण्यात येणार आहे. तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा घरोघरी करण्यात येईल, असे उत्तर प्रदेशचे मुख सचिव राजेंद्र तिवारी यांनी सांगितले. उत्तर प्रदेशमध्ये हे 15 जिल्हे कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेश सरकार 13 एप्रिल रोजी स्थितीची समीक्षा करून पुढील निर्णय घेईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेश