शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

केजरीवाल म्हणाले, "दिल्लीतील पॉझिटिव्हिटी रेट ३० टक्के, ऑक्सिजनची कमतरता; १०० पेक्षा कमी ICU बेड्स"

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 1:32 PM

Coronavirus Updates : दिल्लीत गेल्या २४ तासांत आतापर्यंतची सर्वात मोठी रुग्णवाढ, DDMA चे कुंभ मेळ्यातून परतलेल्यांना १४ दिवस क्वारंटाईन होण्याचे निर्देश

ठळक मुद्देदिल्लीत गेल्या २४ तासांत आतापर्यंतची सर्वात मोठी रुग्णवाढDDMA चे कुंभ मेळ्यातून परतलेल्यांना १४ दिवस क्वारंटाईन होण्याचे निर्देश

गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. गेल्या चोवीस तासांत देशात अडीच लाखांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे दिल्लीतही मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद झाली. शनिवारी दिल्लीत २४,३७५ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले. याचाच अर्थ प्रत्येक तासाला १ हजार कोरोनाबाधितांची नोंद झाली. दिल्लीत एका दिवसात इतक्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. देल्या चोवीस तासांत दिल्लीत १६७ जणांच्या मृत्यूचीही नोंद करण्यात आली. हीदेखील आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रविवारी दिल्लीचे मुख्यमंत्रीअरविंद केजरीवाल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. "गेल्या चोवीस तासांत चोवीस हजारांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली. तर त्याच्या पूर्वी चोवीस तासांत १९ हजार रुग्णांची नोंद झाली होती. यावरून कोरोनाचा प्रादुर्भाव किती तेजीनं वाढत आहे याचा अंदाज येत आहे. दिल्लीतील पॉझिटिव्हिटी रेट वाढून ३० टक्के झालाल आहे. तर चोवीस तासांपूर्वी तो २४ टक्के इतका होता. दिल्लीतील कोरोना रुग्णांसाठी जे बेड्स आरक्षित होते ते तेजीनं भरत चालले आहे. आयसीयू बेड्सचीदेखील कमतरता आहे. संपूर्ण दिल्लीत मिळून आता १०० पेक्षा कमी आयसीयू बेड्स उपलब्ध आहेत," असं केजरीवाल म्हणाले.ऑक्सिजनची कमतरता"सध्या ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे, आम्ही केंद्र सरकारच्या संपर्कात आहोत. त्यांच्याकडून जी मदत मिळत आहे त्यासाठी आम्ही आभारी आहोत. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याशी शनिवारी चर्चा केली. त्यावेळी आम्हाला बेड्सची आवश्यकता असल्याची त्यांना माहिती गिली. तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संपर्क साधून त्यांनाही याची कल्पना देण्यात आली आहे," असं त्यांनी नमूद केलं.कुंभ मेळ्यातून येणाऱ्या क्वारंटाईन होणं आवश्यककेजरीवाल सरकारनं कुंभ मेळ्यातून येणाऱ्यांना १४ दिवस क्वारंटाईन होणं बंधनकारक केलं आहे. दिल्ली डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीनं एक आदेश जारी केला आहे. तसंच तुम्ही ४ एप्रिल पासून आतापर्यंत कुंभ मेळ्यात असाल किंवा १८ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत त्या ठिकाणी जाणार असा तर तुमची संपूर्ण माहिती हा आदेश जारी होण्याच्या २४ तासांच्या आत www.delhi.gov.in या वेबसाईटवर अपलोड करावी लागणार असल्याचे आदेश दिले आहेत. याव्यतिरिक्त कुंभ मेळ्यातून जे कोणी येणार आहेत, त्यांना दिल्लीत परतल्यावर १४ दिवस होम क्वारंटाईन होणं आवश्यक असल्याचंही सांगण्यात आलं आहे.    

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीChief Ministerमुख्यमंत्रीArvind Kejriwalअरविंद केजरीवालKumbh Melaकुंभ मेळा