coronavirus: "Borrow, lend, beg, but provide oxygen to hospitals" High Court slams Central Government | coronavirus: "उधार उसनवारी करा, भीक मागा, पण रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवा’’ हायकोर्टाने केंद्राला फटकारले

coronavirus: "उधार उसनवारी करा, भीक मागा, पण रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवा’’ हायकोर्टाने केंद्राला फटकारले

नवी दिल्ली - मोठ्या प्रमाणात होत असलेल्या कोरोना रुग्णवाढीमुळे देशातील आरोग्य यंत्रणेवर ताण पडला आहे. त्यात कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी लागणााऱ्या ऑक्सिजनसाठी देशभरात धावपळ सुरू आहे. (oxygen shortage in india)अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची टंचाई जाणवत आहे. दरम्यान, ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर दिल्लीतील मॅक्स रुग्णालयाने काल दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरून कोर्टाने केंद्र सरकारला कठोर शब्दात फटकारले. ("Borrow, lend, beg, but provide oxygen to hospitals" High Court slams Central Government )

या प्रकरणाची सुनावणी करताना दिल्ली हायकोर्टाने सांगितले की, रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करणे ही केंद्राची जबाबदारी आहे. अशा परिस्थितीत सरकार एवढे बेफिकीर कसे काय असू शकते. कुणाच्यातरी हातापाया पडा, उधार उसनवारी करा, चोरी करा, पण रुग्णालयांसाठी ऑक्सिजन घेऊन या. आम्ही रुग्णांना मरताना पाहू शकत नाही, अशा परखड शब्दात हायकोर्टाने केंद्र सरकारला सुनावले. 

दिल्ली हायकोर्टाने केंद्र सरकारला सर्व रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे आदेश दिले. तसेच गरज भासल्यास उद्योगांना होणारा ऑक्सिजनचा पुरवठा थांबवण्याचीही सूचना केली. सध्या लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झालेली आहे. दररोज मोठ्या प्रमाणावर लोक मरत आहेत, असे हायकोर्टाने म्हटले आहे. 

दरम्यान, ऑक्सिजनच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दिल्लीसाठीचा ऑक्सिजनचा कोटा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीमध्ये आता ४८० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा केला जाईल. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये ऑक्सिजनची मागणी ६०० टक्क्यांनी वाढली आहे. 

दरम्यान, दिल्लीमध्ये दररोज मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. दररोज २५ हजारांहून अधिक रुग्णांचे निदान होत आहे. तर शेकडो रुग्णांचा मृत्यू होत आहे. 

English summary :
"Borrow, lend, beg, but provide oxygen to hospitals" High Court slams Central Government

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: coronavirus: "Borrow, lend, beg, but provide oxygen to hospitals" High Court slams Central Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.