शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

Coronavirus : 'राहुल गांधींनी कार्टून चॅनलऐवजी न्यूज चॅनल पाहावं'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 8:49 AM

Coronavirus : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कोरोनाचा भारतात होणारा संसर्ग पाहून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

ठळक मुद्देराहुल गांधी यांनी कोरोनाचा भारतात होणारा संसर्ग पाहून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधी यांनी कार्टून चॅनलऐवजी न्यूज चॅनल पाहावं असा सल्ला बिप्लब देब यांनी दिला आहे.

नवी दिल्ली - वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कोरोनाचा भारतात होणारा संसर्ग पाहून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सरकारने योग्य वेळी निर्णायक पाऊल उचललं नाही असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. तसेच सरकारच्या असक्षमतेची मोठी किंमत सगळ्या देशाला चुकवावी लागेल असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारवर निशाणा साधला आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले आहे. 

राहुल गांधी यांनी कार्टून चॅनलऐवजी न्यूज चॅनल पाहावं असा सल्ला बिप्लब देब यांनी दिला आहे. 'आपलं सरकार निर्णायक रुपात काम करण्यासाठी असक्षम आहे. त्याची भारताला मोठी किंमत चुकवावी लागेल. कोरोना व्हायरसशी दोन हात करण्यासाठी त्वरीत आक्रमक पावलं उचलायला हवीत' असं राहुल गांधींनी म्हटलं होतं. राहुल यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केल्यानंतर देब यांनी ट्विटरवरून त्यांना कार्टून चॅनलऐवजी न्यूज चॅनल पाहण्याचा सल्ला दिला आहे. 

'संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात स्क्रिनिंग सुरू आहे. अ‍ॅडव्हायजरी अगोदरपासूनच जारी करण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी क्वारंटाईन सेंटर उघडलेले आहेत. सरकार अगोदरच कोरोनाविरुद्ध आक्रमक पावलं उचलत आहे. कृपया याबद्दल अधिक माहितीसाठी कार्टून नेटवर्क सोडून न्यूज चॅनलवर जा' असं ट्विट बिप्लब देब यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून केलं आहे. जगभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या बुधवारी दुपारी  2,19,033 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे 170 हून अधिक देश प्रभावित झाले असून मृत्यूची संख्या 8,953 वर पोहोचली आहे. दुसरीकडे 82909 लोक बरेही झाले आहेत. आशियाई देशांपेक्षा युरोपमध्ये मृत्यूंची संख्या जास्त आहे. 

देशाला केवळ कोरोनापासूनच धोका नसून एक मोठं संकट भारतासमोर असल्याचं देखील राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. कोरोनासोबतच तोंडासमोर असलेलं आर्थिक संकट हेही प्रचंड मोठं असून त्यासाठी आपल्याला तयार असणे गरजेचं आहे. कारण, आर्थिक संकटामुळे भारतीयांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे, असे ते म्हणाले होते.राहुल गांधी यांनी देशातील आर्थिक स्थितीचा उल्लेख करत मोदी सरकारला लक्ष्य केले होते. अंदमान निकोबारमध्ये त्सुनामी येण्यापूर्वी पाणी खाली गेले होते. अगदी तसंच आता सर्वकाही खाली गेलंय. लवकरच एक मोठा त्सुनामी येणार आहे, असे राहुल यांनी म्हटले होते. पुढे काय होईल, याबाबत सरकारला काहीच माहित नाही. मी पहिल्यापासूनच म्हणतोय, देशात आर्थिक त्सुनामी येणार आहे. मी सातत्याने याकडे लक्ष वेधत आहे, जाणीव करून देत आहे. मात्र, माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले जाते. सरकारकडून मूर्ख बनविण्यात येत आहे. पुढे आर्थिक स्थिती अतिशय खराब होईल, असंही राहुल यांनी म्हटलं होतं. 

 

महत्त्वाच्या बातम्या 

Coronavirus: हाहाकार! इटलीमध्ये 24 तासांत 475 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू; विद्यार्थी बनले डॉक्टर

Coronavirus : खाजगी कंपन्यांवर बडगा, कार्यालयांत जाऊन पालिकेची कारवाई

Coronavirus : हातावर शिक्का मारल्यानंतर पुढे काय? प्रवाशांमध्ये संभ्रम

Nirbhaya Case: 'आम्हाला फासावर लटकवून देशातील बलात्कार थांबणार नाहीत पण...'

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसIndiaभारत